Agastya Nanda : 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. अगस्त्य हा श्रीराम राघवन यांच्या 'इक्कीस' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची तयारी करत असताना काय झालं याविषयीचा एक धक्कादायक किस्सा अगस्त्यनं सांगितला आहे. त्यावेळी एका लष्करी अधिकाऱ्यानं इशारा दिला होता. त्यानंतर अगस्त्यनं लगेच त्याच्या आईला म्हणजेच श्वेता बच्चनला कॉल केला होता. याचा खुलासा स्वत: अगस्त्यनं एका मुलाखतीती केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगस्त्य नंदाचा 'इक्कीस' हा आगामी चित्रपट 1971 मध्ये झालेल्या युद्धावर आधारीत आहे. तर हा चित्रपट शहीद सेकेंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. तर अगस्त्य हा सेकेंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी अगस्त्यची खूप ट्रेनिंग सुरु होती. त्याच्या या चित्रपटाविषयी अगस्त्यनं 'फिल्म कंपॅनियन' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेनिंगचा एक किस्सा सांगत अगस्त्य नंदानं म्हटलं की 'चित्रपटासाठी ट्रेनिंग घेण्यासाठी तो ड्रिलिंग सेशलमध्ये भाग होऊ सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पुणे गेला होता.' 


अगस्त्य त्यावेळी त्याच्यासोबत काय झालं हे सांगत म्हणाला जेव्हा मी रेजिमेंटमध्ये होतो, तेव्हा एक अधिकारी माझ्या जवळ आले आणि त्यांनी खूप कठोर शब्दात सांगितलं की ऐक, त्यात काही चूक करू नकोस. ते आमचे हीरो आहेत. कचरा करू नकोस. मला वाटलं की देवा, हे काय. त्यानंतर मी आईला (श्वेता बच्चन)ला कॉल केला आणि म्हणाले की हे तर माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त इंटेन्स आहे. पण हा एकच अनुभव होता. 


अग्स्तयनं पुढे सांगितलं की जे पॅशन आणि त्यांची भूमिका योग्य साकारण्याची इच्छा आहे ती एकदम जास्त आहे. मला त्यांना निराश करायचं नाही कारण ते आपल्यासाठी जे केलं ते खूप सुंदर आहे आणि निस्वार्थीपणे केलेलं आहे. खरंतर ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे.'


हेही वाचा : 'टाइटॅनिक' फेम अभिनेत्री बाथरुममध्ये ठेवते ऑस्कर! अभिनेत्रीनं सांगितलं खरं कारण


अगस्तनं हे देखील सांगितलं की आर्मीची लाइफस्टाइल, त्यांच्यात असलेली शिस्तचा तो चाहता झाला आहे. तो एका बोर्डिंग शाळेत शिकला आणि त्यामुळे आर्मीचं आयुष्य कसं असतं त्याचं 5 टक्के त्यानं पाहिलं आहे. अगस्त्य नंदानं जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.