सुरक्षारक्षकानं अमिताभ यांच्या नातवाला समजलं डिलीव्हरी बॉय; स्वत: अगस्त्यने सांगितला किस्सा
Agastya Nanda : अगस्त्य नंदानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Agastya Nanda : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त नंदानं जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाला क्रिटिक्स चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांकडून त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण त्याच्यासोबत देखील अशा काही गोष्टी झाल्या आहेत ज्या विचार करून तुम्हाला हसू अनावर होईल. एका सिक्योरिटी गार्डनं अगस्त्यला डिलीवरी बॉय समजले होते. याचा किस्सा त्यानं स्वत: एका मुलाखतीत सांगितला आहे.
अगस्त्य नंदानं नुकतंच इन्स्टाग्रामवर डेब्यू केलं. अगस्त्यनं नुकतीच 'फिल्म कम्पेनियन' ला मुलाखत दिली. या मुलाखतीत कशी त्याची लोकप्रियता नसल्यानं किंवा त्याला ओळखत नसल्यानं एकदा सिक्योरिटी गार्डनं त्याला डिलीव्हरी बॉय समजलं होतं. त्यानं सांगितलं की एकदा 'द आर्चीज' या त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या आधी एका निर्मात्याला भेटायला गेलो होतो. पण, जेव्हा मी एन्ट्रीच्या गेटजवळ गेलो, तर सिक्योरिटी गार्डनं त्याला पार्सलवाला समजलं आणि त्यानं व्हिजिटर्स रजिस्टरवर माझं नाव लिहिण्यास आणि साइन करण्यास सांगितलं. त्यासोबतच त्यानं गेटवर पॅकेट सोडून जाण्यास सांगितले. याविषयी सविस्तर सांगत अगस्त्य म्हणाला, 'मी एका दुसऱ्या ऑफिसमध्ये गेलो होतो, जिथे सिक्योरिटी गार्डनं म्हटलं की इथे ये, इथे ये. त्यांनी सांगितलं की इथे तुझं नाव लिहं. पॅकेज डिलिव्हरीची वेळ लिहं. मी म्हटलं की मी इथे पॅकेट देण्यासाठी आलो नाही. मी इथे दिग्दर्शकाला भेटण्यासाठी आलोय. मग त्यानं म्हटलं की खोट नको बोलूस.' त्यावर त्यानं पुढे सांगितलं की त्याच्यासोबत असं अनेकदा होतं आणि सोशल मीडियावर नसण्याचं हे नुकसान आहे.
हेही वाचा : लेकीच्या रिसेप्शनला आई का नाही? आयराच्या रिसेप्शनला किरणच्या गैरहजेरीबद्दल आमिर खुलासा करत म्हणाला, 'ती...'
अगस्त्यविषयी बोलायचं झालं तर त्यानं नुकतचं इन्स्टाग्रामवर डेब्यू केला आहे. त्यानं एक फोटो शेअर करत 'Hey you! Big hug' असं कॅप्शन दिलं आहे. त्यावर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत त्याचे स्वागत केले आहे. तर अगस्त्यचे इन्स्टाग्रामवर 40 हजार फॉलोवर्स आहेत. तर तो फक्त 6 लोकांना फॉलो करतो. त्यात त्याचे वडील निखिल नंदा, आई श्वेता बच्चन, आजोबा अमिताभ बच्चन, मामा अभिषेक बच्चन, मामी ऐश्वर्या राय बच्चन आणि बहीण नव्या नवेली नंदाला फॉलो करतोय.