Kiran Rao at Ira's Wedding Reception : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयराच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी होती. त्यावेळी आमिरचं संपूर्ण कुटूंब हे आनंदात असल्याचे पाहायला मिळालं. त्यांनी एकत्र पापाराझींसाठी पोझ देखील दिल्या. मात्र, यावेळी सगळ्यात आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावच्या अनुपस्थितीनं सगळ्यांचे लक्ष वेधले. किरण रावनं यावेळी हजेरी का लावली नाही, याविषयी आमिरनं खुलासा केला आहे.
खरंतर आयराच्या लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये किरण रावनं हजेरी लावली होती. इतकंच नाही तर तिनं सगळ्या कार्यक्रमात आनंदानं सहभाग घेतला होता. तिचे आणि आमिरचे लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशात किरणनं आयराच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत हजेरी का लावली नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. त्याचं कारण आमिरनं सांगितलं आहे. आमिरनं लग्नाच्या रिसेप्शनच्या बाहेर असलेल्या हॉलमध्ये पापाराझींची भेट घेतली. यावेळी आमिरनं किरण रावनं रिसेप्शन पार्टीत हजेरी न लावण्याचं कारण सांगितलं आहे. आमिरनं खुलासा केला की किरणची तब्येत ठीक नाही.. त्यामुळे तिला रिसेप्शन पार्टीत यायला जमले नाही.
आमिरनं लेक आयरा आणि जावई नुपूर शिखरेच्या रिसेप्शन पार्टीत 2500 पाहुण्यांना आमंत्रित केलं होतं. त्यात शाहरुख खान, सलमान खान, बच्चन कुटूंब, अंबानी कुटूंब यांची नावं आहेत. तर याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्नीसोबत हजेरी लावली होती. आलेल्या या सगळ्या पाहुण्यांसाठी आमिरनं 9 राज्यांचे वेगवेगळे पदार्थ ठेवले होते. त्यात सगळ्यात जास्त पदार्थ हे गुजराती, लखनऊ आणि महाराष्ट्राचे होते, असे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
आयरा आणि नुपूरच्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 3 जानेवारी रोजी मुंबईत रजिस्टर लग्न केलं. तो तीन दिवसांचा कार्यक्रम होता. तर त्यानंतर त्यांनी उदयपुरमध्ये ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. आयराविषयी बोलायचे झाले तर ती अगत्सू फाऊंडेशनची CEO आहे. ही संस्था मेन्टल हेल्थ सपोर्ट म्हणून काम करते. तर नुपूरविषयी बोलायचे झाले तर तो एक लोकप्रिय फिटनेस कोच, कन्सल्टंच आणि खेळाडू आहे. आयरा आणि नुपूर काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर गेल्यावर्षी नुपूरनं आयराला लग्नासाठी प्रपोज केलं. त्यानंतर त्यांच्या सारखपुड्यासाठी जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं.