मुंबई :  बॉलिवूड अभिनेता Milind soman मिलिंद सोमण हा कायमच त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला गेला आहे. मिलिंदचं राहणीमान असो, त्याच्या कलाविश्वातील वावर असो किंवा मॉडेलिंग क्षेत्रावर त्यानं गाजवलेलं अधिराज्य असो. प्रत्येक बाबतीत तो कायमच अग्रेसर असल्याचं पाहिलं गेलं आहे. असा हा अभिनेता अंकिता कोनवार हिच्याशी विवाहबंधनात अडकल्यापासून तर, चाहत्यांना कपल गोल्स देऊ लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिलिंद आणि अंकिता यांच्यात 26 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे त्यांना अनेक वेळा ट्रोल देखील करण्यात आलं. मात्र या सर्व चर्चांवर दोघांनीही दुर्लक्ष केलं आहे. मात्र, अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत मिलिंदने वयातील अंतरावर मौन सोडलं आहे.


एका मुलाखती दरम्यान मिलिंदला ‘कमी वयाचा लाईफ पार्टनर असल्यामुळे नात्यातील प्रमाणिकतेवर परिणाम होतो का?’ असा प्रश्न विचाण्यात आला. या प्रश्नावर मिलिंदने सडेतोड उत्तर दिलं आहे. 



मिलिंद म्हणाला, 'प्रामाणिकपणाचा थेट संबंध तुमच्या समंजसपणावर अवलंबून आहे. नात्यात शारीरिक संबंध तितकं महत्त्वाचं नसून तुमच्यामधील भावनिक नातं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रामाणिकपणा आणि शारीरिक जवळीकता यांचा काहीही संबंध नाही.' असं सांगत त्याने नात्याचं महत्त्व स्पष्ट करून दिलं आहे.