Ranbir Kapoor AI Photo as Ram : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी आजवर 'दंगल', 'बवाल' आणि 'छिछोरे' सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. नितेश तिवारी हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट रामायणामुळे चर्चेत आहेत. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर नितेश तिवारी यांनी खूप स्ट्रिक्ट असे नियम त्यांच्या टीमवर लागू केले. यानंतर आता रणबीर कपूरची एक झलक पाहायला मिळाली आहे. ही झलक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तर दुसरीकडे ही झलक खरंच रणबीरची नसून आर्टिफिशियल इंटेलीजेंस म्हणजेच (AI) नं बनवलेली आहेत. तर या लूकनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूर हा या चित्रपटात श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे, हे कळल्यापासून त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेना असा झाला आहे. काही दिवसांपूर्वी रणबीरचा एआय फोटो समोर आला होता. त्यात रणबीर श्रीराम यांच्या भूमिकेत शांत बसलेले असताना ते कसे दिसले असते ते दाखवण्यात आलं होतं. मात्र, यावेळी रणबीर कपूर हा एका योद्ध्याचा रूपात दिसत आहे, म्हणजेच रणबीर जेव्हा सीन करेल तेव्हा तो कसा दिसेल याचे चित्र पाहायला मिळत आहे. 



दरम्यान, हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासाठी रणबीरनं 75 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते. मात्र, यात किती सत्य आहे हे अजून काही समोर आलेलं नाही. तर रणबीरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणबीरच्या फोटोविषयी बोलायचे झाले तर त्याचे लांब केस, कपाळावर चंदन आणि हातात धनुष्य बाण पाहायला मिळत आहे. रणबीरचा हा लूक पाहिल्यानंतर काही प्रेक्षकांना 'आदिपुरुष' मधील दाक्षिणात्य अभिनेता प्रभासची आठवण आली आहे. 


हेही वाचा : 'हातात ब्लेड होतं अन् मग...', चाहत्याशी हात मिळवणं अक्षय कुमारला पडलं महागात


रणबीर कपूरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो अ‍ॅनिमल या चित्रपटात दिसला होता. आता त्याचा पुढचा भाग अ‍ॅनिमल ब्रुटलमध्ये त्याचं एक वेगळंच रुप पाहायला मिळणार आहे. कारण यात रणबीरचे डबल रोल पाहायला मिळणार आहेत. खरंतर या दोन्ही चित्रपटांसाठी रणबीरनं मस्कुलर बॉडी बनवली होती आता श्रीराम यांची भूमिका साकारण्यासाठी लीन बॉडी करत आहे.