मुंबई : एकता कपूरच्या नागिन ३ मालिकेचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे आणि प्रोमोतूनच मालिका जबरदस्त असल्याचा अंदाज येत आहे. लोकांनाही हा प्रोमो अत्यंत आवडला आहे. यात करिश्मा तन्ना आणि रजत टोकसची प्रेमकहाणी आहे. यात अनिता हसनंदानीचा लूकही जबरदस्त जमून आला आहे. प्रोमोतून मालिकेबद्दलची उत्सुकताही वाढते. या इंटरेस्टींग कथेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. नागिन ३ मध्ये अनिता हसनंदानी आणि करिश्मा तन्नाशिवाय सुरभी ज्योती ही प्रमुख भूमिकेत आहे. 


प्रेक्षकांची उत्सुकता वाढली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागिग ३ पूर्वी आलेला नागिन आणि नागिन २ प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरल्यामुळे नागिन ३ बद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.



 


नागिग सिरीजच्या पहिल्या दोन सीजनमध्ये मौनी रॉय आणि अदा खान प्रमुख भूमिकेत होत्या आणि त्यांना प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली होती. त्यामुळे खुद्द एकता कपूरही शो बद्दल खूप उत्सुक आहे. तिने सोशल मीडियावर या शो चा पहिला प्रोमोही शेअर केला असून मालिकेतील सर्व प्रमुख कलाकारांची ओळखही करुन दिली आहे.