COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : काही दिवसांपासून बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्मा (Aindrila Sharma) ही मृत्यूला झुंज देत होती. दरम्यान, या लढाईत ती अपयशी ठरली आणि एंड्रिलाचे निधन झाले आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्रीचे निधन झाले आहे. एंड्रिला बऱ्याच दिवसांपासून कोमात होती. या बातमीनंतर अभिनय क्षेत्रातील अनेकांनी तिला लवकर बरी हो असे मेसेज देखील केले होते. मात्र, या सगळ्या प्रार्थना पूर्ण होऊ शकल्या नाहीत. (Aindrila Sharma Death) 


एंड्रिलाला वाचवण्यासाठी कुटुंबानं आत्तापर्यंत 12 लाखांचा खर्च केला होता. दरम्यान, बॉलिवूड गायक अरिजित सिंग (Arijit singh) आता एंड्रिलाच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. एंड्रिला ही 24 वर्षांची आहे. तिनं सगळ्यांचा असा निरोप घेतल्यानं आश्चर्याचा धक्का बसला आहे. एंड्रिलानं कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात केली होती, परंतु 1 नोव्हेंबर रोजी एंड्रिया शर्माला ब्रेन स्ट्रोकचा सामना करावा लागला. यानंतर एंड्रिला शर्माची प्रकृती बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 



यानंतर, 14 नोव्हेंबर रोजी एंड्रिलाला हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी अनेक हृदयविकाराचा झटके आले, ज्यामुळे एंड्रिलाची तब्येत आणखी खालावली. खरंतर असं झालं होतं की, एंड्रिला शर्माची प्रकृती चिंताजनक असल्याने ती व्हेंटिलेटरवर होती, मात्र 20 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील रुग्णालयात एंड्रिला शर्मानं अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोकमुळे एंड्रिलाला फ्रंटोटेम्पोरोपेरिटल डी कॉम्प्रेसेव्ही क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करावी लागली.


दरम्यान, एंड्रिला शर्माचा प्रियकर सब्यसाची चौधरी याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ती लवकरात लवकर बरी व्हावी याची प्रार्थना करत एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. अशा परिस्थितीत एंड्रिला शर्माच्या मृत्यूने सब्यसाचीला हादरवून सोडले आहे. एंड्रिलाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. एंड्रिलाने झूमर या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.(aindrila sharma passes away due to brain stroke )