Aishwarya and Aaradhya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राज ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. ऐश्वर्याचे लाखो चाहते आहे. ऐश्वर्या जिथे कुठे जाते तिथे तिचे चाहते पाहायला मिळतात. तिला पाहताच तिचं नाव घेऊन लागतात. तिचे असे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालं होतात. ऐश्वर्याचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमात ऐश्वर्याला पाहताच एका अनोळखी मुलानं तिला पाहताच तिचं नाव मोठ्यानं घेऊ लागला हे पाहून तिची लेक आराध्यानं दिलेली रिअॅक्शन ही चर्चेचा विषय ठरली आहे. 


आराध्याचा व्हिडीओ पाहा - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्याचा हा व्हिडीओ तिच्या एका फॅनपेजवरून शेअर करण्यात आला आहे. खरंतर हा व्हिडीओ गणेशोत्सवातील आहे. खरंतर ऐश्वर्या ही तिची आई वृंदा राय आणि लेक आराध्या बच्चनसोबत गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी पोहोचली होती. त्यावेळी तिला पाहता ऐश्वर्याचा चाहता लगेच तिला प्रेमानं हाक मारू लागला. ऐश्वर्याच्या छोट्या चाहत्यानं तिला आवाज देण्यास सुरुवात केली. तर तो 'ऐशवलया लाय' अशी हाक मारू लागला. सुरुवातीला आराध्या हसली मात्र, आईसोबत पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा त्या छोट्या चाहत्यानं ऐश्वर्याला हाक मारली. यावेळी तो पुन्हा म्हणाला, 'ऐशवलया लाय' हे ऐकताच ऐश्वर्या तर मागे बघू हसली मात्र, आराध्यानं अरे बाबा हे काय असं बोलताना जे आपले हाव भाव असताता तसे हावभाव केले आहेत. आराध्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 



हेही वाचा : 'रियासाठी कपडे काढायला तयार...', शहनाज गिलचं धक्कादायक वक्तव्य


आराध्याला पाहताच नेटकरी म्हणाले...


आराध्याचा हा व्हिडीओ पाहताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'आराध्याची रिअॅक्शन खूप गोड होती.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'किती क्यूट आहे ती.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'ती तिच्या आईसारखीच सुंदर आणि चांगल्या स्वभावाची आहे.' आणखी एक नेटकरी ऐश्वर्या आणि आराध्याविषयी म्हणाला, 'ती पण खूप सुंदर आहे आणि तिची लेक सुद्धा... त्या दोघींचा स्वभाव किती चांगला आहे. मला आई-लेकीची ही जोडी फार आवडते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ऐशवलया लाय' खूप क्यूट आहे आणि हसायचं इमोजी वापरलं.