मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली. यादरम्यान या स्टार फॅमिलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा आराध्या आणि ऐश्वर्याच्या लूकची होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्याच्या प्रेग्नेंसीची चर्चा
यावेळी ऐश्वर्याने काळ्या रंगाचा लांब कोट घातला आहे. तर आराध्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आणि अभिषेक ग्रे-लाइट पिंक कलरच्या ट्रॅकसूटमध्ये दिसला. तिघांच्याही तोंडावर मास्क होतं. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा ऐश्वर्या रायच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याची चर्चा सर्व सोशल मीडिया युजर्स करत आहेत.


बेबी बंप लपवत होती ऐश्वर्या?
तसंच, ऐश्वर्याचे लूज फिटिंग कपडे आणि तिच्या चालण्याच्या शैली पाहून, कमेंट सेक्शनमधील लोकांनी असंही म्हटलं आहे की, बच्चन कुटुंबातील सून तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला सांगतो की ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्या सुट्टीवरुन न्यूयॉर्कहून परतले आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ट्रोल होतेय ऐश्वर्या 
या तिघांचा एअरपोर्टवरून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून लोक ऐश्वर्याला ट्रोल करत आहेत. काही लोकं ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याचं सांगत आहेत तर काही लोकं तिच्या काळ्या लांब कोटची तुलना बुरख्याशी करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करत एका सोशल मीडिया युजर्सने विचारलं, "ती प्रेग्नंट आहे का?" आणखी एका युजरने विचारलं आहे की, ती सौदी अरेबियातून परतली आहे का?