मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह  आल्यामुळे त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिग बींना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच त्यांचे चाहते अत्यंत व्यकूळ झाले. बिग बींनंतर थोड्याच वेळात अभिनेता अभिषेक बच्चनला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.  अभिषेकवर देखील मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता समस्त बच्चन कुटुंबीयांचीआणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन आणि आराध्या यांचे एन्टीजेन टेस्ट (Antigen Test) रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पण त्यांचे स्वाब रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. रविवारी सकाळी १० पर्यंत त्यांचे स्वाब रिपोर्ट येतील असं सांगितलं जात आहे. 



दरम्यान, बिग बींची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे. अमिताभ बच्चन यांची प्रकृती आता व्यवस्थित आहेत. अमिताभ यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. रूग्णालयाच्या अलगीकरणाच्या विभागात अमिताभ यांना ठेवण्यात आलं आहे. अशी माहिती नानावटी रूग्णालयाच्या अधिकृत व्यक्तींकडून देण्यात आली आहे. 


अमिताभ यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं ट्विटवरून सांगितलं. त्यानंतर अभिषेकने देखील शनिवारी सकाळी माझे आणि वडिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आम्हा दोघांना कोरोनाची सौम्य लक्षण असल्याचं  ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं.