ऐश्वर्या नारकर असं ठेवतात स्वत:ला फिट; जाणून घ्या त्यांच्या फिटनेसचं सिक्रेट
`सातव्या मुलीची सातवी मुलगी` ह्या मालिकेत ऐश्वर्या नारकर ह्या `रुपाली राज्याध्यक्ष` ची भूमिका साकारतात आहे. त्या कामामध्ये व्यस्त असूनही फिटनेस व निरोगी जगण्यासाठी काय काय करतात व कसा वेळ देतात ह्या बाबतीत त्यांनी नुस्के सांगितले आहेत.
मुंबई : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ह्या मालिकेत ऐश्वर्या नारकर ह्या 'रुपाली राज्याध्यक्ष' ची भूमिका साकारतात आहे. त्या कामामध्ये व्यस्त असूनही फिटनेस व निरोगी जगण्यासाठी काय काय करतात व कसा वेळ देतात ह्या बाबतीत त्यांनी नुस्के सांगितले आहेत. ऐश्वर्या नारकर ह्या गेल्या वीस वर्षा पासून जिम व वेट ट्रेनिंग करत आहे आणि नुकतंच त्यांनी योग सराव करायला सुरवात केली आहे. त्यांच्या सुंदर त्वचेचे व दाट केसांचे रहस्य व्यायाम आणि शुद्ध आहारच आहे.
ह्या फिटनेस जीवनशैलीला घेऊन त्यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, " माझा दिवस सकाळी ५:३० वाजता सुरु होतो आणि शूटिंगला जाण्याची तयारी करून त्या नंतर रोज अंदाजे ३० - ४० मिनिटं योग करते ज्याच्याने मला स्पुर्ती व मनाची शांती मिळते. योग मी माझ्या पुतणी कडून शिकते आहे जी एक योग प्रशिक्षक आहे. व्यायाम करण्यासोबत मी पौस्टिक आहार घेते. गव्हाचे आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळते व माझा सगळा आहार शुद्ध तुपामध्ये बनतो. भात हा पदार्थ माझ्या आहारात लहानपणापासून आहे व सगळ्यांना माझं येव्हडच म्हणणं असेल की तुमच्या लहानपणीच्या खाण्याच्या सवयी मोडू नका. आपल्या आयुष्यात समतोल आणि सातत्य ठेवले कि आपलं आरोग्य निरोगी राहत. माझ्यासाठी निरोगी राहण्याचे मंत्र म्हणजे झोप, पौष्टीक आहार आणि व्यायामच आहे." पाहत राहा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' सोमवार ते शनिवार रात्री १०:३० फक्त आपल्या झी मराठीवर.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी टीव्ही मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर त्या खूप सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ऐश्वर्या स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या डान्सच्या व्हिडिओने त्यांच्या चाहत्यांना वेड लावलं होतं. ऐश्वर्या आणि पती अविनाश यांच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेत्री वयाच्या 48 व्या वर्षीही तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते आणि म्हणूनच त्या 25 वर्षांच्या मुलीसारखी स्टाईल करतात.