Aishwarya Narkar Avinash Narkar: रूपेरी पडद्यावर आपल्याला ज्याप्रमाणे विविध जोडपी पाहायला आवडतात त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यातील कपल्सही आपल्या भुरळ घालतात. त्यांचे गोड रिलेशनशिप पाहून आपल्यालाही त्यांच्याप्रमाणेच कोणतरी लाईफ पार्टनर असावा अशी मनोमनं इच्छा असते. बॉलिवूडमध्येही अशी अनेक जोडपी आहेत. जी आपल्याला आवडतात आणि आपण त्यांना फॉलो करतो. मराठी चित्रपटसृष्टीतही असे अनेक कपल्स आहेत. सध्या चर्चा आहे ती म्हणजे मराठीतल्या अशाच एका लोकप्रिय कपलची. आपल्या लग्नाचा नुकताच त्यांनी 25 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्या निमित्तानं ऐश्वर्या यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्याखाली खूप रोमॅण्टिक असं कॅप्शनही लिहिलं आहे. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. मराठी चित्रपटसृष्टीतील हे सर्वांचेच लाडके जोडपे आहे. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांच्या या व्हिडीओमुळे सर्वत्र चर्चा रगंलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ऐश्वर्या नारकर या 'झी मराठी' वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. ऐश्वर्या नारकर यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमधून कामं केली आहे. त्याचसोबत त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांतूनही कामं केली आहेत. सोबतच अविनाश नारकर हे देखील लोकप्रिय नाटक, मालिका आणि चित्रपट अभिनेते आहेत. सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचे रील्स हे चांगलेच लोकप्रिय असतात. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर ही तूफान चर्चा रंगलेली असते. त्यांचा कच्चा बदामचा रील हा चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे दोघांची सोशल मीडियावर ही चर्चा असतेच. 


हेही वाचा - हृतिक आणि सबाच्या रोमॅण्टिक फोटोवर पहिल्या पत्नीची कमेंट पाहून नेटकरी का वैतागले?


यावेळी त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये लिहिलं आहे की, ''आता 25 हून अधिक वर्षं झाली. त्याने नेहमीच मला पाठिंबा दिला. ज्या गोष्टी मी करू शकेन की नाही असं मला वाटत असताना त्याने मला त्या गोष्टी करायला प्रोत्साहन दिलं. मला स्वतःचा शोध घ्यायला मदत केली. काही बाबतीत आमची मतं वेगळी असली तरीही आम्ही प्रत्येक क्षण एन्जॉय करतो. यालाच आनंदी आयुष्य म्हणतात. मला माहिती आहे की मित्र म्हणून तू नेहमी माझ्याबरोबर होतास, आहेस आणि यापुढेही असणार आहेस. न संपणारी मैत्री...'' असं हटके कॅप्शन त्यांनी यावेळी शेअर केलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या त्यांच्या या रिलला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. हे रील सोशल मीडियाव चांगलेच व्हायरल होते आहे.