IIFA च्या पुरस्कार सोहळ्यात चर्चा होती ती आराध्या आणि ऐश्वर्याची. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होताना दिसत आहे. असं असताना ऐश्वर्या देखील फक्त आराध्यासोबत कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात जाताना दिसते. IIFA मध्ये पत्रकारांनी ऐश्वर्याला प्रश्न विचारला, 'आराध्या तुझ्यासोबत का असते'? यावर ऐश्वर्याने दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण यासोबतच आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी IIFA च्या पुरस्कार सोहळ्यात ठेका धरला होता. या व्हिडीओची एक क्लीप व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडीओ 2022 IIFA मधील आहे. 


या व्हिडिओमध्ये तुम्ही अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांच्यासोबत डान्स करताना पाहू शकता, तो परफॉर्मन्सच्या अर्ध्यातच स्टेज सोडून ऐश्वर्यासोबत ठेका धरताना दिसतो. व्हिडिओमध्ये अभिषेक प्रेक्षकांमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे. अभिषेकच्या या परफॉर्मन्सचा व्हिडिओ आयफाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता.


ऐश्वर्या - अभिषेकचा थ्रोबॅक व्हिडीओ 



ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्यासोबत अभिषेक बच्चनच्या परफॉर्मन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'तत्तड तच्चड' या हिट गाण्यावर आपल्या कुटुंबासोबत नाचताना अभिषेकची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाचत असताना, अभिषेक ऐश्वर्याच्या शेजारी बसलेल्या आराध्याला फ्लाइंग किस देतो आणि आपल्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करतो. अभिषेक त्याच्या डान्स परफॉर्मन्ससाठी ऑफ व्हाइट कलरची शेरवानी परिधान करताना दिसत आहे. IIFA 2022 मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्या 10 वर्षांची झाली.