मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (aishwarya rai bachchan) ही तिच्या सौंदर्यामुळं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करुन गेली. सध्या ऐश्वर्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसली, तरीही तिच्या सौंदर्यावर भाळणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी झालेली नाही. बॉलिवूडसह हॉलिवूडपर्यंत आपली छाप सोडणारी ही अभिनेत्री तिच्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 47 व्या वर्षी ऐश्वर्याच्या नावे करोडोंच्या संपत्तीची नोंद आहे. caknowledge.comच्या माहितीनुसार तिच्या एकूण संपत्तीचा आकडा 227 कोटींच्या घरात आहे. 2021 मध्ये ऐश्वर्याची वार्षिक कमाई 31 मिलियन डॉलर इतकी असल्याची माहिती समोर आली. 


एका महिन्याला ऐश्वर्या जवळपास 1 कोटी रुपये कमवते. परिणामी वर्षभरासाठी हा कमाईचा आकडा 12 कोटींच्याही पलीकडे जातो असं म्हटलं जातं. देशातील सर्वाधिक प्रमाणात कर देणाऱ्यांच्या यादीत ऐश्वर्याच्याही नावाचा समावेश आहे. 


 


मुंबईत ऐश्वर्या आपल्या कुटुंबासह राहते. या मायानगरीत तिची दोन घरं आहेत. तर, दुबईमध्येही तिचं आलिशान घर असल्याचं म्हटलं जातं. वार्षिक कमाईचा आकडा जितका मोठा, तितकंच ऐश्वर्याच्या लक्झरी कारचा खजिनाही हेवा वाटेल असाच आहे. 


तिच्याकडे Mercedes-Benz S500, Audi A8 L, Lexus LX 570 and Mercedes-Benz GLS अशा एकाहून एक अत्य़ाधुनिक फिचर्स असणाऱ्या कार आहेत. एका चित्रपटासाठी ही सौंदर्यवती जवळपास 5- 6 कोटी रुपये इतकं मानधन घेते अशीही चर्चा आहे. काय मग, आहे ना ऐश्वर्याचं ऐश्वर्य थक्क करणारं?