Aishwarya Rai And Abhishek Bachchan: ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये भांडण? अभिषेक बच्चनच्या `त्या` कृत्यामुळे भडकली ऐश्वर्या राय!
Aishwarya Rai And Abhishek Bachchan Video : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय सिनेविश्वातील अनेकांचे आवडते जोडप आहेत. मात्र अलिकडेच या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
Aishwarya Rai And Abhishek Bachchan Video : बॉलिवूडमध्ये सर्वात आवडत्या जोडीपैकी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai And Abhishek Bachchan) आहेत. कपल गोल्स देण्याच्या बाबतीत ही जोडी कधीही मागे पडली नाही. या दोघांनी 2007 मध्ये लग्न केले होते. पण आता समोर आलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते दोघांना वेगळे होण्याचा सल्ला देत आहेत. नेमकं काय घडलं की या दोघांना चाहत्यांनी असा काहीसा सल्ला दिला....
बॉलिवूड कपल ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन (Aishwarya Rai And Abhishek Bachchan) यांचा विवाह 20 एप्रिल 2007 रोजी झाला. 2011 मध्ये ऐश्वर्या रायने मुलगी आराध्या बच्चनला जन्म दिला. वर्षांनंतरही ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील प्रेम अजिबात कमी झाले नाही. पण आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. एवढेच नाही तर चाहते या जोडप्याला वेगळे होण्याचा सल्लाही देत आहेत.
अन् ऐश्वर्याला राग आला...
गेल्या दिवाळीच्या निमित्ताने ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Aishwarya Rai And Abhishek Bachchan) एका पार्टीसाठी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी गेले होते. त्यावेळी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन दिवाळी पार्टीत सहभागी होण्यासाठी एकत्र आले आहेत. अशा परिस्थितीत पापाराझी या जोडप्याला कॅमेऱ्यासमोर पोज देण्यासाठी थांबवतात. मग अचानक आणि नकळत अभिषेकची टक्कर पत्नी ऐश्वर्याशीला लागते.
मात्र, यानंतर ऐश्वर्या ज्या पद्धतीने अभिषेककडे पाहते ते पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर विविध चर्चांना उधान आले आहे. तसेच यावर कमेंटचा वर्षाव होत असून एका युजर्सने म्हटले की, ' हे दोघे एकत्र खुश दिसत नाही, त्यांनी वेगळे व्हावे.' तर दुसरा युजर्सने म्हटले, होतं असं कधी तरी, त्यात एवढं रागवण्यासारख काय?"
ऐश्वर्याच्या लूकवर अभिषेक बच्चन फिदा
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चने मणिरत्नम दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन 1 या चित्रपटातून दमदार कमबॅक केलं. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. ऐश्वर्याने या चित्रपटात दुहेरी भूमिका साकरल्या होत्या. आता याच चित्रपटाचा सीक्केल पोन्नियिन सेल्वन 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.