मुंबई : कलाकारांना किती मानधन मिळते हा उत्सुकतेचा विषय असून त्याची नेहमीच चर्चा होते. काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्राच्या मानधनाची सर्वत्र चर्चा होती. तिने एका कार्यक्रमात पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी तब्बल पाच कोटींची मागणी केली होती.


बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या प्रियंका चोप्रा, दीपिका पदूकोण, कंगणा राणावत या बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री आहेत. पण बच्चन बहूला देखील या यादीत आपले नाव सामावून घ्यायचे आहे, असे दिसते. लग्न, मुलगी यामुळे चित्रपटसृष्टीपासून लांब गेलेली ऐश्वर्या पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण करू पाहत आहे.


 चित्रपटाच्या रिमेकमध्ये ऐश्वर्या


‘रात और दिन’ या नर्गिस दत्त यांच्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये ऐश्वर्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात नर्गिस यांनी मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असलेल्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांना या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये ती दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. भूमिकेची तयारी करण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर या कामाकडे पूर्ण लक्ष केद्रींत केल्याने इतर कामांकडे पाठ फिरवावी लागेल. आता ऐश्वर्या ही भूमिका कशी साकारते, हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे.


इतके मानधन


या चित्रपटासाठी तिने तब्बल १० कोटींचे मानधन घेतल्याचे समजतेय. मात्र तिची ही मागणी कोणत्याही आडकाठीशिवाय मान्य झाली आहे.