Aaradhya Bachchan : बॉलिवूडमधील (Bollywood ) अभिनेत्री या आपल्या मुलांची खूप काळजी घेताना दिसतात. चित्रपटाच्या व्यस्त शुटिंगमुळे (shooting) त्यांना तासंतास घराबाहेर राहवं लागतं. अगदी परदेशातही जावं लागतं. अशावेळी मुलांपासून त्यांना दूर राहवं लागतं. आपण अनेक वेळा पाहिलं आहे की, हे अभिनेता-अभिनेत्री (Actor-actress) अशावेळी कुटुंबियांसाठी क्वालिटी टाइम (Quality time) काढतात. तर अनेक वेळा आपण पाहिलं आहे, या अभिनेत्री आपल्या मुलांना कधी प्रमोशनदरम्यान (promotion) किंवा फॅशन शो (Fashion show)अगदी चित्रपटाच्या सेटवरही (Movie sets) घेऊन येतात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या सेटवर नेमकं काय होतं हे जसं सर्वसामान्यांना जाणून घ्यायचं असतं, तशीच उत्सुकता बॉलिवूडमधील स्टार्स किड्सला (Stars Kids) पण असते. अशीच एक स्टार किड जेव्हा चित्रपटाच्या सेटवर येते आणि जेव्हा ती असं काही करते की, चित्रपटाच्या सेटवर फक्त तीच चर्चा होते. 


ही स्टार किड आहे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात...म्हणजे अभिषेक (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांची मुलगी आराध्या...सध्या ऐश्वर्या राय तिचा आगामी चित्रपट पोन्नयान सेल्वन 1 (Ponniyin Selvan I) च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ऐश्वर्याने आराध्याचा एक किस्सा सांगितला. ऐश्वर्याने सांगितलं की आराध्याला चित्रपटाच्या सेटवर येण्याची संधी मिळाली. त्यावेळी मणिरत्नम सरांना पाहून आराध्याला खूप आश्चर्य वाटलं आणि तिला खूप आनंद झाला.(aishwarya Rai Bachchan aaradhya said action on sets of ponnyan selvan 1 NM) 


जेव्हा आराध्या वडील अभिषेक बच्चनसोबत चित्रपटाच्या सेटवर पोहोचली. त्यावेळी ऐश्वर्याला राणीच्या भूमिकेत पाहून तिला खूप आनंद झाला होता. पोन्नियिन सेल्वन-1 मध्ये ऐश्वर्या पजुवूरच्या राणी नंदिनीची भूमिका साकारत आहे. पण पुढे आराध्याने जे काही केलं ते पाहून ऐश्वर्याचा आनंद गगनात मावत नव्हता. 


आराध्या म्हणाली की,...


ऐश्वर्या म्हणाली की, 'पीरियड ड्रामा तिच्यासाठी नेहमीच रोमांचक राहिला आहे. सेटवर येण्याचा आनंद तिच्यात डोळ्यात स्पष्ट दिसतं होता. ऐश्वर्या पुढे म्हणाली, 'आराध्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता जेव्हा मणिरत्नम (Mani Ratnam) सरांनी तिला 'ऍक्शन' (Action) म्हणण्याची संधी दिली. ती आनंदाने वेडी झाली होती. तिने मला सांगितलं की सरांनी मला अॅक्शन बोलण्याची संधी दिली. मला वाटत नाही. आपल्यापैकी कोणालाही ती संधी मिळाली असती. मणिरत्नम सरांनी आराध्याला दिलेली संधी तिच्यासाठी अमूल्य आहे. मला खात्री आहे की ती मोठी झाल्यावर ती तिच्यासाठी एक सुवर्ण आठवण असेल. 


30 सप्टेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित (film will release on September 30)


हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी तामिळ (Tamil), तेलगू (Telugu), मल्याळम (Malayalam), कन्नड (Kannada) आणि हिंदीसह (Hindi) पाच भाषांमध्ये (languages) जगभरात प्रदर्शित होणार आहे. ऐश्वर्याशिवाय या चित्रपटात विक्रम (Vikram), कार्ती (Karti), जयम रवी (Jayam Ravi), त्रिशा (Trisha), ऐश्वर्या आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.तर या चित्रपटाचे संगीत ए आर रहमान (AR Rahman) यांनी दिले आहे.