Aishwarya Rai Bachchan and Vivek Oberoi : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्याचे लाखो चाहते आहेत. ऐश्वर्या ही नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहते. ऐश्वर्यानं तिची लव्ह लाईफ आणि अफेअर्स नेहमीच गुपित ठेवले होते. ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉय यांच्या रिलेशनशिपविषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. दरम्यान, ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ब्रेकअपनंतर जेव्हा ऐश्वर्या पहिल्यांदा विवेक ओबेरॉयला (Vivek Oberoi) अचानक भेटते तेव्हा त्या दोघांची रिअॅक्शन काय असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या सासरे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. हा कार्यक्रम म्हणजे अवॉर्ड शो आहे. विवेक ओबेरॉय स्टेजवर आल्यावर ऐश्वर्या आणि अमिताभ यांच्या चेहऱ्यावर असणारी रिअॅक्शन बदलते. इतकंच काय तर ऐश्वर्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. यावेळी अमिताभ यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील बदलताना दिसतात. 


हेही वाचा : Ranbir Kapoor नं का फेकून दिला होता चाहत्याचा फोन? अखेर कारण आलं समोर


जेव्हा विवेक स्टेजवर असतो तेव्हा ऐश्वर्या आणि अमिताभ या दोघांना काही समजत नाही, पण थोड्यावेळानं ऐश्वर्या तिच्या शेजारी बसलेला फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत बोलायला करायला सुरुवात करते. तर अमिताभ बच्चन हे नाराज झाल्याचे दिसते. तर त्या दोघांकडे दुर्लक्ष करत विवेक त्याचं भाषण पूर्ण करताना दिसतो. दरम्यान, ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉयचं रिलेशनशिप हे चर्चेत होतं. विवेक ओबेरॉय आधी ऐश्वर्या राय ही सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 


ऐश्वर्या काही दिवसांपूर्वी थकबाकीच्या नोटीसमुळे चर्चेत होती. नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील सिन्नरमधील आडवाडी गावात पवन ऊर्जा कंपनीत तिची गुंतवणूक आहे. आयकर बचत करण्यासाठी सुजलोन पवन ऊर्जा निर्मिती कंपनीत अनेक कलाकारांननी गुंतवणूक केल्या आहेत. ही कंपनी ऐश्वर्या राय बच्चन हिच्या जमीनवर आहे. ऐश्वर्याची एक हेक्टर 22 आर जमीन आहे. याच जमिनीचं एक वर्षाचं कर ऐश्वर्याने थकवलं आहे. त्यामुळे तिला नोटीस बजावण्यात आली आहे. अभिनेत्रीने 22 हजारांचा कर थकवला आहे. त्यासंदर्भात तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे. 


'या' कंपन्यांनाही पाठवली नोटीस


मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. ऐश्वर्या राय बच्चनसोबत  बाराशे थकीत अकृषक मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आयटीसी मराठा लिमिटेड ,हॉटेल लीला वेंचर ,बलवेल रिसॉर्ट, कुकरेजा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, एअर कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड, मिटकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, छोटा भाई पटेल कंपनी, राजस्थान गम प्रायव्हेट लिमिटेड अशा अनेक इतर कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.