मला स्तनांच्या आकारावरुन...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, 'शाळेत...'

Famous Bollywood Actress Opens Up About Trolling: या अभिनेत्रीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. तिने तिला होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल बोलताना शाळेत असतानाचे किस्सेही सांगितले आहेत. कोण आहे ही अभिनेत्री ती काय म्हणालीये पाहूयात...  

| Nov 27, 2024, 12:50 PM IST
1/12

ananyapanday

मनोरंजनसृष्टीमध्ये आल्यानंतर पहिल्याच वर्षी काय काय घडलं यासंदर्भातही तिने भाष्य केलं आहे. नक्की कोण आहे ही अभिनेत्री आणि तिने काय म्हटलंय जाणून घ्या...

2/12

ananyapanday

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगचा आपल्यावर कसा परिणाम झाला याबद्दल या तरुण अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.   

3/12

ananyapanday

अनन्याने ती शाळेत असतान तिला तिच्या छातीचा उल्लेख करत चिडवलं जायचं, हिणवलं जायचं असं सांगितलं आहे. मला 'फ्लॅट चेस्ट' (वक्षस्थळं लहान असल्याने) आणि 'हेअरी' (म्हणजेच त्वचेवर भरपूर केस आहेत अशी) असं म्हणत चिवडलं जायचं असाही खुलासा अनन्याने केला आहे.

4/12

ananyapanday

ट्रोलिंगला कंटाळून आपण चित्रपटसृष्टीमधील करिअरच्या सुरुवातीला मानसोपचारतज्ज्ञांचा सल्लाही घेतला होता असंही अनन्याने म्हटलं आहे.  

5/12

ananyapanday

'वी द वुमन' या विशेष कार्यक्रमामध्ये बरखा दत्त यांच्याबरोबर संवाद साधताना अनन्याने हा खुलासा केला होता. तुला सर्वात वाईट पद्धतीने ट्रोल कधी आणि कसं करण्यात आलं होतं? असा सवाल अनन्याला विचारण्यात आला.  

6/12

ananyapanday

"माझ्याबद्दल बरंच काय काय बोललं गेलं. त्यामुळे मी एखादी घटना सांगू शकत नाही. जेव्हा मी पहिल्यांदा मनोरंजनसृष्टीत काम करु लागले तेव्हा कोणीतरी माझं फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केलं होतं. त्यावर त्यांनी ते माझ्यासोबत माझ्या शाळेत होते असं सांगून मी माझ्या शिक्षणाबद्दल खोटं सांगत असल्याचं लिहिलं होतं," असं अनन्याने सांगितलं.  

7/12

ananyapanday

"सुरुवातीला मी 'कोणीच यांच्यावर विश्वास ठेवणार नाही' असा विचार करत होते. मात्र लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. तेव्हा काही दिवस मला नक्कीच सोशल मीडियावर आपण नको जायला असं वाटतं," असंही अनन्याने सांगितलं. सध्याचा काळ हा फार धोकादायक असून सोशल मीडियावर छोट्यात छोट्या आवाजालाही मोठं करुन सांगितलं जातं.  

8/12

ananyapanday

"मी यापूर्वी थेरिपी घेतली आहे. आता मला त्याची गरज लागत नाही. मला आता माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवता येतं. मला आधी या साऱ्यामुळे फार निराश वाटायचं. सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्याचा जवळचा संबंध आहे," असं अनन्या म्हणाली.

9/12

ananyapanday

"अनेकदा तुम्ही काहीतरी तुमच्याबद्दलची एखादी कमेंट स्कोअल करताना वाचून जाता आणि त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय हे तुम्हाला कळतही नाही कारण तुम्ही सारं काही सामान्य आहे असं स्वत:ला समजावत राहता," असं अनन्या नेमकं तिच्याबरोबर काय घडतं यासंदर्भात भाष्य करताना म्हटली.  

10/12

ananyapanday

"मी कमेंट वाचून विसरुन जाईल असं ठरवलं तरी होत नाही. काही आठड्यांनंतरही ती कमेंट कुठे ना कुठे तुमच्या डोक्यात सतत डोकावत राहते. त्यामुळे हे सारं असं डोक्यात साचत जातं आणि त्याचा त्रास होतो," असं अनन्या म्हणाली.  

11/12

ananyapanday

"शाळेत असताना मला कुबड असलेले मुलगी असं चिडवायचे. मला माझ्या छातीवरुनही चिडवताना 'छाती सपाट असणारी मुलगी' (स्तनांच्या आकारावरुन हिणवण्याचे प्रकार) असं चिडवलं गेलं," असं 26 वर्षीय अनन्याने सांगितलं.  

12/12

ananyapanday

"मला शाळेत अगदी कोंबडीचे पाय आणि केसाळ मुलगी असंही चिवडलं जायचं. मात्र तेव्हा ते आमच्या पुरतं होतं. मात्र सोशल मीडियावर छोट्यात छोटी गोष्ट जगभर व्हायरल केली जाते. त्यामुळेच मला हा आता धोकायकाय काळ वाटतो," असं अनन्या म्हणाली.