Aishwarya Bachchan Trolled: सध्या कान्स चित्रपट महोत्सवाची सगळीकडेच धूम आहे. बॉलिवूडसह हॉलिवूड आणि जगभरातील अनेक सेलिब्रेटी हे कान्स महोत्सवासाठी (Aishwarya Rai Bachchan Leaves for Cannes 2023) रवाना झाले आहेत. कालपासून या लोकप्रिय सोहळ्याची सुरूवात झाली. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकारही कान्स महोत्सवात डेब्यू करणार आहेत. अभिनेत्री सारा अली खान, मृणाल ठाकूर यांनी यावेळी कान्स चित्रपट महोत्सवाला पहिल्यांदा हजेरी लावली होती. तेव्हा सगळीकडेच सध्या कान्सच्या रेड कार्पेट लुकचीही चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी कान्स चित्रपट महोत्सव अटेंड करण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनही (Aishwarya and Aradhya gets trolled) आपली लेक आराध्यासह कान्स चित्रपट महोत्सवासाठी निघाली आहे. ती एअरपोर्टवर स्पॉट झाली परंतु यावेळी मात्र ट्रोलर्सनी तिला आणि आराध्याला ट्रोल केलं आहे. 


यावेळी नेटकरी ऐश्वर्याची फॅशन पाहून हैराण झाले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ऐश्वर्या आणि आराध्याची हेअरस्टाईलही सारखीच आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून ऐश्वर्याही आपले त्याचपद्धतीचे आऊटफिट घालताना दिसते आहे. त्यामुळे यावेळी तिनं परिधान केलेला ब्लॅक ड्रेस पाहून नेटकरी वैतागले आहेत. काहींना कमेंट्समध्ये लिहिलंय की, ''आता ऐश्वर्या आणि आराध्यानं आपली हेअरस्टाईल बदलणं मनावर घ्यायला हवं.'' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''ऐश्वर्याची अशी फॅशन पाहून आराध्याची काही प्रगती ऐश्वर्या करेल का'', तर अशाच एका युझरनं लिहिलंय की, ''तिच हेअरस्टाईल, तेच कपडे तेच बुट, ऐश्वर्याच्या आयुष्यात काही वेगळं होतंय की नाही का सगळ्याला कंटाळली आहे?''


ऐश्वर्यानं अनेकदा कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली आहे. यापुर्वी तिचे अनेक रेड कार्पेटवरील लुक हे व्हायरल झाले होते. कान्स चित्रपट महोत्सवात पर्पल कलरची लिपस्टिक लावल्यानं ऐश्वर्या ट्रोल झाली होती. त्यानंतर अनेकदा तिला तिच्या फॅशनसाठीही ट्रोल करण्यात आले होते. परंतु त्यानंतर ऐश्वर्या मात्र आपल्या बिनाधास्त फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते आहे. आराध्यानंही आपला एक असा वेगळा लुक सेट केला आहे. त्यामुळे तिच्या लुकचीही अनेकदा चर्चा होताना दिसते.


हेही वाचा - स्वघोषित गुरु Radhe Maa आठवतेय? 'या' वेब सीरिजमधून तिचा मुलगा करतोय OTT वर पदार्पण


मध्यतंरी एका अभिनेत्रीचीही मुलगी आराध्याप्रमाणे दिसत असल्यानं त्या दोघींचीही बरीच चर्चा रंगली होती. आराध्यासारखाच तिचाही लुक (Aradhya Bachchan Fashion) आणि काहीशी चेहरेपट्टी असल्यानं चाहते त्या दोघींनाही समजून घेण्यात गडबडले. त्यांचे फोटोही अनेकदा व्हायरल झाले होेते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आराध्या बच्चन ही नेहमीच ह्या ना त्या कारणासाठी चर्चेत असते. तिच्या लुकसाठीही ती ओळखली जाते. आराध्यानंही आपल्या आईसोबत मागे कान्स फिल्म फेस्टिवल हजेरी लावली होती. त्यामुळे तिचीही तेव्हा चर्चा झाली होती.