स्वघोषित गुरु Radhe Maa आठवतेय? 'या' वेब सीरिजमधून तिचा मुलगा करतोय OTT वर पदार्पण

Radhe Maa son OTT Debut: सतत चर्चेत असलेल्या स्वयंघोषित राधे मांबद्दल तुम्ही ऐकले असेलच. अनेक चित्रपटांतून काम केल्यानंतर आता तिचा मुलगा ओटीटीवर (Radhe Maa) येणार आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा रंगली आहे. 'इन्सपेक्टर अविनाश' (Inspector Avinash) या वेबसिरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 17, 2023, 02:29 PM IST
स्वघोषित गुरु Radhe Maa आठवतेय? 'या' वेब सीरिजमधून  तिचा मुलगा करतोय OTT वर पदार्पण title=
फाईल फोटो

Radhe Maa son OTT Debut: आता ओटीटीवरील विश्व वाढू लागलं आहे. त्याचसोबत सर्वत्र ओटीटीचे प्रेक्षकही (OTT) वाढू लागले आहेत. ओटीटी आल्यामुळे कलाकारांनाही अनेक नानाविध विषयांवरील चित्रपट, वेबसिरिज करायला मोठी संधी मिळते आहे. नव्यानं आलेले कलाकारही आता ओटीटीवर पहिल्यांदा डेब्यू करताना दिसत आहेत तर दुसरीकडे लोकप्रिय चित्रपट कलाकारही चित्रपटानंतर ओटीटीवर डेब्यू करत आहेत. सतत चर्चेत राहणारी आणि वाद राहणारी स्वयंघोषित गुरू राधे मां (Self Styled Guru Radhe Maa) तुम्हाला आठतेय का, तिचा मुलगा आता लवकरच ओटीटीवरून पदार्पण करतो आहे. सलमान खानसोबत तीन हीट चित्रपटांमधून काम केलेल्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत तो स्क्रिन शेअर करणार आहे. सध्या सोशल मीडियावरून त्याचीच चर्चा आहे. 

'इन्सपेक्टर अविनाश' (Inspector Avinash Trailer) या वेबसिरिजमधून तो ओटीटीवर डेब्यू करणार आहे. या वेबसिरिजचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. या वेबसिरिजमधून अभिनेता रणदीप हुडा प्रमुख भुमिकेत आहे. जिओ स्टुडिओचे प्रोडक्शन असणाऱ्या या वेबसिरिजचे दिग्दर्शन हे नीरज पाठक यांनी केले आहे. 18 मे पासून ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरिजचा धमाकेदार ट्रेलर हा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. 

राधे मांचा मुलगा हरजिंदर सिंगची या वेबसिरिजमध्ये महत्त्वपुर्ण भुमिका आहे. यातून तो एका एसटीएफ ऑफिसरची भुमिका करतो आहे. आयएनएसच्या वृत्तानुसार, हरजिंदरनं सांगितले की, हा सेट 90 च्या काळातील आहे. उत्तरप्रदेशमध्ये घडणारी ही घटना आहे. या सिरिजमध्ये प्रेक्षकांना एक्शन पाहायला मिळणार आहे. यावेळी माझा पहेरावही अगदी त्या काळातील पोलिसांचा जसा असतो त्याप्रमाणे बनवला गेला आहे. 

हेही वाचा - रश्मिका मंदानासोबत सेल्फी घेताना एकच झुंबड, ती संतापली पण... एका क्षणात काय झालं? पाहा VIDEO

रणदिप हुडासोबत काम करण्याचा अनुभवही आपला फार चांगला आणि सुखदायी असल्याचे यावेळी हरजिंदर यानं स्पष्ट केले आहे. अभिनयाचे चांगले धडेही त्यांच्याकडून शिकता आल्याचे त्यानं सांगितले सोबतच यावेळी आपल्या नव्या डेब्यूसाठी उत्सुक असल्याचेही त्यानं सांगितले. राधे मां हे नावं गेली वीस वर्षे तरी चर्चेत आहे.

आपल्या वादग्रस्त विधानांवरूनही ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. राधे मां ही बिग बॉसमध्येही झळकली होती. तेव्हाही तिची फार चर्चा झाली होती. हरजिंदर सिंगनं यापुर्वी काही चित्रपटांतूनही कामं केली आहेत. त्यानं 'ड्रीम गर्ल' आणि 'आय एम बन्नी' या चित्रपटांतून कामं केली आहेत. आपल्यालाही क्रिकेट आणि अभिनय या दोनच गोष्टी आवडत असल्याचे त्यानं मध्यंतरी एका मुलाखतीतून सांगितले होते.