Fact Check: `मी आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय`; अभिषेक बच्चनचा Video Viral
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : `मी आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय`, असं खुद्द अभिषेक बच्चन याने सांगितलंय. अभिषेक बच्चनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : गेल्या अनेक महिन्यांपासून बच्चन कुटुंबात काहीतरी घडतंय अशा बातम्या समोर येत होत्या. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (aishwarya rai bachchan) यांचं घटस्फोट होणार आहे, अशा मथळाच्या बातम्या समोर येत होत्या. पण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) असो किंवा जया बच्चन (Jaya Bachchan) अगदी ऐश्वर्या आणि अभिषेकनेही यावर कधी मीडियासमोर भाष्य केलं नाही.
मुंबईतील सर्वात गँड लग्न अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट अंबानी यांच्या लग्नसोहळ्यात बच्चन कुटुंब सून आणि नातीशिवाय आलं होतं. पण काही वेळा ऐश्वर्या आणि आराध्या दोघेची या सोहळ्याला आल्यात. त्यामुळे उपस्थितींसह नेटकऱ्यांनी घटस्फोट होणार यावर बोलायला सुरुवात केली. त्यानंतर अभिषेकने सोशल मीडियावर घटस्फोटसंदर्भातील एक पोस्ट लाइक केल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या अशाच समोर आल्या होत्या. त्यानंतर एका दिवशी या दोघांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना 'आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे' असं जाहीर केलं. त्यामुळे आता अभिषेक बच्चनेही सोशल मीडियावरुन नात्याबद्दलच भाष्य करणारा हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (aishwarya rai bachchan and I decided to divorce Abhishek Bachchan deepfake Video Viral Fact Check)
'मी आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय'
आता तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये खुद्द अभिषेकने आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचा सांगितलंय. या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन सांगतोय की, जुलै महिन्यात त्याने आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय. त्याने या व्हिडीओमध्ये आराध्याच नाव घेत कारणही सांगितलंय.
व्हिडीओचं सत्य काय?
त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आम्ही या व्हिडीओचा तपास केल्यास असं दिसून आलं की, हा एक डीपफेक व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ नीट पाहिल्यास असं लक्षात येतं की, अभिषेक बच्चनचं लिप सिंकिंग अजिबात जुळत नाहीय. त्यामुळे हा व्हिडीओ बनावट आणि डीपफेक वाटतोय. हा व्हिडीओ अभिषेकचा जुना व्हिडीओ घेऊन एआय तंत्रज्ञान किंवा ऑनलाइन टूल्सने तयार केलाच दिसतोय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी निर्मात्याच्या या व्हिडीओचा निषेध केला असून त्याचावर टीका केलीय.