मुंबई : ऐश्वर्या राय बच्चनने बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आजही तिच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की, ती 49 वर्षांची आहे. ऐश्वर्या राय हिचं बालपण  मुंबईत गेलं. ती मुंबईतच नावारुपाला आली. ऐश्वर्या राय हिला पहिलं मेडिकलचा अभ्यास करायचा होता मात्र तिने आर्किटेक्चरचा अभ्यास सुरु केला. मात्र पुढे मॉडेलिंगसाठी तिने तेही क्षेत्र सोडलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ढाई अक्षर प्रेम' हा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचा पहिला चित्रपट उमराव जान या चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या आण अभिषेक यांच्यामध्ये प्रेम फुललं. 20 एप्रिल 2007 मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांनी लग्न केलं.


नुकतंच तिच्या खाकी चित्रपटाने १९ वर्ष पूर्ण केली आहेत. २३ जानेवरी २००४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, संजय दत्त, तुषार कपूर, ऐश्वर्या रॉयसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली होती.


या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. मात्र हा सिनेमा ऐश्वर्या रायमुळे  खूप जास्त चर्चेत आला होता. या चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्यासोबत असं काही घडलं की, त्यामधून ती मरता मरता वाचली.


ऐश्वर्या रॉयसोबत घडलेला भयानक प्रकार त्यावेळी बातम्यांमध्ये आला होता. या चित्रपटाचं शूटिंग सुरु होत. विशेष म्हणजे या चित्रपटातील अनेक स्टार्सने स्वतः स्टंट्स करायला प्राधान्य दिल होत. आणि त्याचदरम्यान हा सगळा प्रकार घडला होता. एका सीनदरम्यान ऐश्वर्या रायला भरधाव येणारी जीप थांबवून त्यामध्ये चढायचं होतं.


मात्र सीनदरम्यान येणारी जीप इतकी भरधाव होती की, त्यावर ताबा ठेवणं कठीण झालं आणि यादरम्यान एक अपघात घडला ज्यामध्ये ऐश्वर्या रॉयचा पाय फ्रॅक्चर झाला होता. या अपघाताने अनेकांची झोप उडवली होती. मात्र ऐश्वर्या यातून सुखरूप बचावली असल्याचं समजल्यानंतरच चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.