अभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांना ऐश्वर्याच्या `त्या` कृतीमुळे पुन्हा मिळाली हवा! पुन्हा चाहत्यांसमोर प्रश्न उपस्थित
Aishwarya Rai : ऐश्वर्या रायच्या त्या कृतीमुळे सगळीकडे एकच चर्चा...
Aishwarya Rai : गेल्या बऱ्याच महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन विभक्त झाल्याची आणि त्यांच्यात मदभेद असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या सगळ्यात स्वत: ऐश्वर्या पुढे येऊन काही सांगितलं नाही. मात्र, अभिषेक बच्चननं त्याच्या लग्नाची अंगठी दाखवत या सगळ्या अफवांवर पूर्णविराम लावला होता. दरम्यान, या सगळ्यात ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात तिनं तिच्या लग्नाची अंगठी घातलेली नाही. ऐश्वर्याचा हा व्हिडीओ पाहून सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
ऐश्वर्या राय तिची लेक आराध्यासोबत दुबई गेली आहे. तिथे ती एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. दुबई पोहोचल्यानंतर तिथल्या ऑर्गनाइजर्सनं त्या दोघींचे स्वागत केले. एक चाहता तर ऐश्वर्यासाठी फुलांचा गुच्छ घेऊन आला होता. त्यानंतर ऐश्वर्या लेक आराध्यासोबत पुढे चालताना दिसली. व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या हातात तिच्या लग्नाची अंगठी दिसली नाही, त्यामुळे पुन्हा एकदा वेगवेगळ्या गोष्टींच्या चर्चा रंगू लागल्या. लोक यावेळी अशी आशा करत आहेत की ऐश्वर्या आणि अभिषेकचं नात संपलं? खरंच ते दोघं घटस्फोट घेणार आहेत? रिपोर्ट्सनुसार, हे प्रश्न यामुळे उपस्थित राहिले आहेत कारण काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनच्या हातात देखील लग्नाची अंगठी नव्हती. तो देखील लग्नाच्या अंगठीशिवाय दिसला होता आणि आता ऐश्वर्यानं देखील आता लग्नाची अंगठी काढली.
काही महिन्यांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की ऐश्वर्या आणि अभिषेक हे ग्रे डिव्हॉर्स घेऊ शकतात. मात्र, या सगळ्या विभक्त होण्याच्या चर्चांमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकसोबतच बच्चन कुटुंबापैकी कोणी यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. ऐश्वर्या आणि अभिषेकनं काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2007 मध्ये लग्न केलं. त्यांना एक मुलगी असून आराध्या असं तिचं नाव आहे.
हेही वाचा : KBC 16 : स्पर्धकासाठी अमिताभ बच्चन यांनी चक्क बदलले ‘कौन बनेगा करोडपति’ चे नियम
ऐश्वर्या आणि अभिषेक विभक्त होण्याची बातमी तेव्हा जास्त चर्चेत आली जेव्हा दोघं मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नात जेव्हा ते वेगवेगळे आले होते तेव्हा चर्चा सुरु झाली होती. अभिषेक त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत यावेळी दिसला होता आणि ऐश्वर्यानं आराध्यासोबत एन्ट्री घेतली होती. त्यानंतर जवळपास सगळ्याच ठिकाणी ऐश्वर्या अभिषेकशिवाय दिसली.