मुंबई : सलमान खान - ऐश्वर्या राय हे दोन कायम चर्चेत असतात. आता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुन्हा एकदा ही दोन नावं चर्चेत आली आहेत आणि त्याला कारण देखील तसंच आहे. अनेक वर्षांपासून सलमान खानचा पीआर सांभाळणारा मॅनेजर आता ऐश्वर्याशी संबंधित काम करणार आहे. सलमानचा मॅनेजर आता ज्युनिअर बच्चन म्हणजे अभिषेक बच्चनचा पीआर सांभाळणार आहे. हल्लीच सलमानने आपली मॅनेजर रेश्मा शेट्टीशी आपला रस्ता वेगळा केला आहे. एका सोर्सने दिलेल्या माहितीनुसार अभिषेकची पत्नी ऐश्वर्याने रेश्मा शेट्टीला हायर करण्याचा विचार सुचवला. कारण अभिषेकच्या थंड पडलेल्या कामाला आणखी स्पीड मिळेल. रेफ्यूजीमधून डेुब्यू केलेल्या अभिषेक बच्चनने काही सिनेमे चांगले दिले. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याचं करिअर मंदावलं आहे. तो खूप सिलेक्टिव सिनेमात आपल्याला पाहायला मिळतो. 


हे आहे खरं कारण?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याला असं वाटतं की, अभिषेकच्या करिअरला थोडं पुश करण्याची नितांत गरज आहे. खूप दिवसांपासून अभिषेक कोणत्याच सिनेमांत दिसलेला नाही. तो खूप सिलेक्टिव प्रोजेक्टवर फोकस करताना दिसत आहे. आता शेवटचं अभिषेकला हाऊसफुल्ल 3 या सिनेमांत पाहायला मिळालेलं आहे. 


अशी चर्चा होती की, अभिषेक जेपी दत्ता यांच्या पलटन या सिनेमाचा हिस्सा होणार होता. लदाखमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर अशी बातमी आली की, अभिषेक या सिनेमांत नसल्याचं कळलं. आता अशी चर्चा आहे की, संजय लीला भन्सालीच्या साहिर लुधियानवीच्या कॅरेक्टरमध्ये अभिषेक दिसणार आहे. त्यामुळे आता अशी चर्चा आहे की, अभिषेकच्या करिअरला पुश करण्याची मोठी जबाबदारी रेश्माकडे आहे. रेश्मा एक ब्रँडच्या रुपात काम करणार आहे. 


सलमान खान आणि रेश्मा हे दोघे खूप वर्षांपासून एकत्र आहेत. मात्र आता सोहेल खानने सुरू केलेल्या पीआर एजन्सीमुळे त्याने रेश्माला कामावरून काढलं आहे.