मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली ऐश्वर्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट (Bollywood vs South) या वादावर ऐश्वर्यानं तिचं मत मांडलं आहे. 


आणखी वाचा : दीपिका आधी Ranbir Kapoor 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत ही होता रिलेशनशिपमध्ये...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्यानं आतापर्यंत अनेक तामिळ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देण्यात आलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्यानं दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूड चित्रपट यावरून सुरु असलेल्या वादावर तिचं मतं मांडलं आहे. 


आणखी वाचा : फॅशन करणं Janhvi Kapoor ला पडलं महागात, झाली Oops Moment ची शिकार


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा : विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक


'आपल्याला पारंपरिक विचारांतून बाहेर पडण्याची गरज आहे. आताची वेळ चांगली आहे कारण दोन्ही चित्रपटसृष्टीतील दुरावा कमी होत आहे. आपल्याला वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आपले चित्रपट जागतिक पातळीवर पोहोचायला मदत होते, म्हणून मला असं वाटतं की आपण पारंपरिक विचार करण्याऐवजी वेगळा विचार करायला हवा. कलेबद्दल, कलेच्या प्रत्येक पैलूबद्दल प्रेक्षकांना माहिती व्हायला हवी. काही वर्षांपूर्वी माहिती गोळा करण्याची साधनं मर्यादीत होती, परंतु आता तसं राहिलं नाही. आता देशभरातील तसंच जगभरातील प्रेक्षकांना वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट बघणं, त्यांचा आनंद घेणं सोपं झालं आहे,' असं ऐश्वर्या म्हणाली. (Aishwarya Rai Bachchan Reacts On Bollywood vs South Movie Debate Says Barriers Have Gone Down) 


आणखी वाचा : एक वर्षापूर्वीचं 'ते' प्रकरण कपूर कुटुंबाला भोवणार; एकता कपूर आणि आई शोभा यांना अटक वॉरंट जारी


‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटात ऐश्वर्या ही पझुवूरची राणी नंदिनी आणि तिची आई मंदाकिनी देवी अशी दुहेरी भूमिका साकारत आहे. ऐश्वर्या व्यतिरिक्त या चित्रपटात चियान विक्रम, कार्थी, रवी, शोभिता धूलिपाला, तृषा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चोल साम्राज्याच्या महागाथेवर आधारीत ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटाचा पहिला भाग येत्या 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.