Aishwarya-Sangeeta नाही तर `ही` अभिनेत्री होती Salman Khan ची पहिली गर्लफ्रेंड, Kiara Advani सोबत आहे खास नातं
Salman Khan Girlfriend : सलमान खान त्याचा लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत असतो. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत त्याच नाव जोडल्या गेलं होतं. संगीता बिजलानीपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत अनेक टॉपच्या अभिनेत्रीसोबत सल्लूच्या लग्नाची चर्चा रंगली.
Salman Khan First Girlfriend : बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान (Salman Khan) याच नाव कुठल्या ना कुठल्या अभिनेत्रीसोबत जोडलं जातं. मुंबईत मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी सलमान खान एका तरुणीसोबत दिसून आला. त्यानंतर ती तरुणी कोण आहे अशी चर्चा रंगली. पण आम्ही तुम्हाला सांगता ती सलमान खानची भाची होती. असो, सलमानच्या लव्ह लाइफबद्दल (Salman Khan First Affair) अनेक किस्से आहेत. सगळ्यात जास्त गाजलेलं प्रेम प्रकरण म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai)यांचं...पण सलमान खानच्या वाढदिवसला अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) आली त्यावेळी सलमानने तिच्या डोक्यावर किस केली त्यानंतर चाहत्यांचा भुवया उंचावल्या. अनेकांना आजही वाटतं की पहिल्यांदा सलमान खानने संगीता बिजलानीला डेट केलं होतं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटले, सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड (Salman Khan Girlfriend Name) कोणी दुसरी होती.
कोण होती सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड?
एंटरटेन्मेंट न्यूजनुसार, जेव्हा सलमान खान सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा सल्लूची भेट शाहीन बानोशी (Shaheen Bano) झाली. 80-90 च्या काळातील ही प्रसिद्ध अभिनेत्री होती. तुम्हाला ही भेट कोणी घडवली हे ऐकून अजून धक्का बसेल. तर ही भेट कियारा अडवाणी यांची आई यांनी घडवली होती. कियारा अडवाणीची (Kiara Advani Mother) आई ही शाहीन बानोची चुलत बहिण आहे. रिपोर्टनुसार अशी माहिती मिळते की, सलमान खान आणि शाहीन बानो या दोघांनीही 'मैने प्यार किया'साठी ऑडिशन दिलं होतं. मात्र सलमान खानची निवड झाली आणि शाहीनला नकार देण्यात आला होता. (Aishwarya rai Bachchan Sangeeta Bijlani this actress was not Salman Khan first girlfriend love Kiara Advani shaheen banu)
म्हणून तुटलं त्यांचं नातं
एंटरटेन्मेंट न्यूजनुसार, 1980 मध्ये मिस इंडिया झालेल्या संगीता बिजलानी आणि सलमान खानची जवळीक वाढली. त्यानंतर शाहीन बानोला या दूर झाल्या.
असं बोलं जातं आहे की, शाहीनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमान आणि संगीता हे दोघे लग्न करणार होते. पुढे संगीता आणि सलमान यांचंही नातं तुटलं.
मिस इंडिया झाल्यानंतर संगीता बिजलानी 1980 मध्ये सलमान खानला भेटली होती. सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या वाढत्या भेटींनी शाहीन बानोला बाजूला केले. ब्रेकअपनंतर सलमान खान आणि संगीता इतके जवळ आले की दोघेही लग्न करणार होते. त्यानंतर सलमानचे आणखी एक अफेअर उघड झाले आणि भाईजानचे संगीतासोबतचे नातेही तुटले.