Aishwarya Rai Bachchan On Aaradhya: ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन बी-टाऊनच्या लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. आराध्या अजूनही खूप लहान आहे. असं असलं तरी आतापासूनच जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांचं चांगलं बॉन्डिंग आहे. विमानतळ असो की कार्यक्रम या ठिकाणी दोघी एकत्र दिसतात. ऐश्वर्या नेहमी तिच्या मुलीचा हात धरून तिच्यासोबत इव्हेंटमध्ये पोहोचते. कान्स फिल्म फेस्टिव्हल असो की कुठलीही स्टार पार्टी सर्वत्र ऐश्वर्या आणि आराध्या हातात हात धरुन जाताना दिसतात. काही वर्षांपूर्वी, ऐश्वर्याने आराध्या तिच्या सभोवतालचे ग्लॅमर जग कसे पाहते? याबद्दल खुलासा केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या राय बच्चनने फिल्मफेअरला सांगितले होते की, “मी तिच्यासाठी किंवा तिचं जीवन निवडण्यासाठी येथे नाही. मी तिची आई आहे. मला फक्त तिला आनंदी, निरोगी आणि सुरक्षितरित्या वाढवायचे आहे. ती सध्या जगाकडे ज्या प्रकारे पाहते.  मी तिच्या नजरेतून अनुभवते. ते शुद्ध आहे, देवासारखे आहे. तुम्ही तुमच्या मुलाद्वारे देवाला पाहता आणि हेच तिच्यासोबत आणि तिच्याद्वारे अनुभवायचे आहे.” 


 ऐश्वर्या राय बच्चन मणिरत्नमच्या 'Ponniyin Selvan: I' मध्ये दिसणार आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्न केले आणि 2011 मध्ये आराध्याचे स्वागत केले.