`आराध्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतेय` ऐश्वर्याचा `तो` व्हिडीओ नेटकऱ्यांनी वारंवार पाहिला
Aishwarya Rai Bachchan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांची. त्यांचा एका नवा व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. यावेळी ऐश्वर्या राय बच्चन ट्रोल झाली आहे.
Aishwarya Rai Bachchan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या एका व्हिडीओची जोरात चर्चा आहे. आपल्या आईच्या वाढदिवशी आराध्यानं चाहत्यांशी संवाद साधला होता. आता यादरम्यानच आराध्याचा आणि ऐश्वर्याचा अजून अक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. यावेळी नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला ट्रोल केले आहे. त्यामुळे तिची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. माईकवर बोलत असताना आराध्याला संपुर्णपणे नियंत्रित करायचा ती प्रयत्न करते आहे. याची सध्या चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे नेटकरीही ऐश्वर्याचा हा व्हिडीओ वारंवार पाहताना दिसत आहेत. परंतु नक्की असं घडलंय तरी काय हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. ऐश्वर्यानं नुकताच आपला 50 वा वाढदिवस साजरा केला आहे. 2013 साली तिच्या 40 साव्या वाढदिवसाची जोरात चर्चा ही रंगलेली होती.
ऐश्वर्याची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा असते. त्यातून ऐश्वर्या आणि आराध्या या दोघी अनेकदा एकत्र स्पॉट होताना दिसतात. सध्या त्यांच्या अशाच एका व्हिडीओची चर्चा आहे. ऐश्वर्या जितकी अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी आहे तितकीच ती आई म्हणूनही प्रसिद्ध आहे. तिचीही प्रेरणा अनेक आया घेताना दिसतात.
सध्या एका कार्यक्रमात त्या दोघी या सहभागी झाल्या होत्या. तेव्हा ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त त्या दोघींनी केक कापला व आराध्यानं यावेळी आईसाठी खास भाषणही दिलं. आराध्या ही 12 वर्षांची आहे. परंतु यावेळी नेटकऱ्यांनी एक गोष्ट मात्र पुरेपूर ओळखली होती आणि ती म्हणजे माईकवर बोलत असताना आराध्याचा माईक हिसकावून ऐश्वर्या तिला थांबण्यासाठी भाग पाडते आहे की काय अशी चर्चा नेटकऱ्यांमधून सुरू झाली होती. त्यामुळे सध्या यावरून नेटकरी तिला तूफान ट्रोल करत आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : '...म्हणून त्यांचा सल्ला ऐका' नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर सुनील शेट्टी स्पष्टच बोलला
यावेळी अभिषेक बच्चननंही आपल्या प्रिय बायकोसाठी तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली होती. त्याचसोबत अनेक सेलिब्रेटींनी तिच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 2007 साली ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न पार पाडले. 2011 साली त्यांच्या मुलीचा आराध्या बच्चनचा जन्म झाला. ऐश्वर्यासोबत आराध्याचीही चर्चा आहे. तिचेही व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसतात. यावेळी हा व्हिडीओही तूफान व्हायरल झाला आहे.