मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या 'फन्ने खान' या चित्रपटातून पुन्हा पदार्पण करणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र ऐश्वर्याने आयत्यावेळी चित्रीकरणाला नकार दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नकाराचं कारण म्हणजे तिच्या व्यक्तिरेखेसाठी डिजाईन केलेला ड्रेस तिला आवडला नाही. चित्रपटात ऐश्वर्या एका पॉप स्टारची भूमिका साकारत आहे. मात्र त्या व्यक्तिरेखेला डिजाईन केलेला ड्रेस तिला शोभत नसल्याचे तिचे म्हणणे आहे आणि म्हणून तिने चित्रीकरणाला नकार दिला. हा ड्रेस फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिजाईन केला होता. 


'फन्ने खान' चित्रपटात ऐश्वर्या सोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव देखील झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अनिल कपूर आणि ऐश्वर्या २० वर्षानंतर एकत्र कां करणार आहेत.