मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. विश्व सुंदरी ऐश्वर्या रायने तिच्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आजही या अभिनेत्रीची क्रेझ तिच्या चाहत्यांमध्ये पहायला आहे. ऐश्वर्या राय आता फार कमी चित्रपटांमध्ये दिसते. पण जेव्हा-जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा तिचे चाहते तिचं काम पहायला उत्सुक असतात. अभिनेत्रीच्या हृदयात कोण राहतं हे ऐश्वर्या रायच्या चाहत्यांना जाणून घ्यायला नेहमी आवडतं. यावर ऐश्वर्यानेही एकदा उत्तर दिलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या राय रणबीर कपूरसोबत 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटात शेवटची दिसली होती. ऐ दिल है मुश्किल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ऐश्वर्या राय 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचली होती. यावेळी ऐश्वर्याने या प्रश्नावरुन पडदा उचलला की, तिला जगात सर्वात सुंदर कोण आहे असं वाटतं.


खरंतर कपिल शर्माने ऐश्वर्याचं कौतुक करत तिला जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हटलं होतं. यानंतर कपिल शर्माने विचारलं की तुला सर्वात सुंदर कोण आहे असं वाटतं? यावर ऐश्वर्याप्रत्युत्तरात देत म्हणते की, मी ज्याच्याशी लग्न केलं आहे. म्हणजेच, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रायचं हे उत्तर ऐकून कपिल शर्मासोबत सगळे प्रेक्षक टाळ्या वाजवू लागतात.



कपिल शर्मा अभिनेत्री ऐश्वर्या रायसमोर म्हणातो की, त्यालाही अभिषेक बच्चन खूप आवडतो... तो जेव्हा आमच्या शोमध्ये येतो. कपिल हे बोलताच ऐश्वर्या त्याला अडवते आणि म्हणते, मला अभिषेक जास्त आवडतो... यावर कपिल पंच मारत म्हणतो की, माझी कितीही मर्जी असली तरी तूच त्याच्या मुलांची आई होणार आहेस.. हे बोलताच ऐश्वर्या हसू लागते.