Ponniyan Selvan Trailer : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) गेल्या अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. 'ऐ दिल है मुश्किल' (Ae Dil Hai Mushkil) सिनेमाच्या यशानंतर ऐश्वर्या पुन्हा अभिनय करताना दिसणार आहे. ऐश्वर्याच्या बहुप्रतीक्षित Ponniyan Selvan सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे. मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला 'पोनियान सेल्वन-1' हा ऐतिहासिक सिनेमा (historical cinema) आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय व्यतिरिक्त दक्षिणेकडील चित्रपट स्टार विक्रमसह इतर अनेक कलाकार आहेत. तीन मिनिटे 23 सेकंदांचा ट्रेलर रिलीज होताच यूट्यूबवर कव्हर झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाच्या ट्रेलरमधील प्रत्येक दृश्य थक्क करणारे आहेत. ऐश्वर्यापासून ते विक्रमचा लूक आणि रुबाब पाहण्या सारखा आहे.  ग्राफिक्स आणि युद्धाची दृश्ये (Graphics and battle scenes) आवाक् करणारी आहेत. महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्याचा राजेशाही थाट प्रत्येकाला हैराण करणारा आहे. 


महत्त्वाचं म्हणजे सिनेमा दोन भागांमध्ये साकारण्यात येणार आहे. सिनेमाची कथा कल्किच्या पुस्तकावर आधारित आहे. दक्षिण भारतात दीर्घकाळ राज्य करणाऱ्या चोल साम्राज्याची ही कथा आहे. 



Ponniyan Selvan सिनेमाचा पहिला भाग  30 सप्टेंबर रोजी पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  'पोनियान सेल्वन-I'च्या हिंदी ट्रेलरला अभिनेते अनिल कपूरने आवाज दिला आहे.


Ponniyan Selvan मध्ये ऐश्वर्या राय बच्चन राणी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाद्वारे अभिनेत्री तब्बल 4 वर्षांनी पुनरागमन करत आहे. ऐश्वर्या शिवाय सिनेमात जयराम रवी, सरथकुमार प्रभू आणि ऐश्वर्या लक्ष्मी यांच्याही मुख्या भूमिका आहेत.


Ponniyan Selvan सिनेमापूर्वी ऐश्वर्या राय आणि मणिरत्नम यांनी 'गुरू', 'रावण' आणि 'इरुवर' यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते. आता चाहते ऐश्वर्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत.