PHOTO: महाराष्ट्राचा हिम्मतगड... महाबळेश्वरमध्ये उगम पावणारी सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते 'त्या' संगमावर असेलला बाणकोट किल्ला

कोकणात अनेक जलगदुर्ग आहेत. प्रत्येक जलदुर्ग तितकाच वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. यापैकीच एक आहे तो दापोलीपासून 47 किमी आणि श्रीवर्धनपासून 21 किमी अंतरावर असलेले बाणकोट किल्ला. हा किल्ला हिम्मतगड नावाने ओळखला जातो.  ग्रीक प्रवासी टॉलेमी आणि चिनी प्रवासी हियुन त्सांगने यांच्या नोदींमध्ये हिम्मतगडच्या  प्रवासाची नोंद आहे.  

| Jun 07, 2024, 14:48 PM IST

Bankot Fort in Ratnagiri Maharashtra : कोकणात अनेक जलगदुर्ग आहेत. प्रत्येक जलदुर्ग तितकाच वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. यापैकीच एक आहे तो दापोलीपासून 47 किमी आणि श्रीवर्धनपासून 21 किमी अंतरावर असलेले बाणकोट किल्ला. हा किल्ला हिम्मतगड नावाने ओळखला जातो.  ग्रीक प्रवासी टॉलेमी आणि चिनी प्रवासी हियुन त्सांगने यांच्या नोदींमध्ये हिम्मतगडच्या  प्रवासाची नोंद आहे.  

 

1/7

निसर्ग सौंदर्यासह कोकणाला एतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे. याच कोकणात आहे हिम्मतगड नावाचा अनोखा किल्ला.

2/7

हरिहरेश्वर ते बाणकोट किल्ल्याचे अंतर साधारण 5 ते 6 किमी आहे. खाडीतूनच किल्ल्यापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. हरिहरेश्वर पासून 4 किमी अंतरावर असलेले बागमांडला गावातून येथे जाण्यासाठी फेरी बोट मिळतात. 

3/7

मुंबई  गोवा महामार्गावर महाडच्या अगोदर टोल फाटयावरून आंबेत, मंडणगड मार्गे बाणकोटला जाता येत. मुंबईपासून बाणकोट किल्ला अंदाजे 248 कि.मी. आहे. बाणकोट गावातून पक्क्या रस्त्याने स्वत:चे वाहान घेऊन किल्ल्यावर जाता येते.  

4/7

.बाणकोट किल्ल्यापासुन  35 किमी अंतरावर असलेला मंडणगड किल्ला तसेच दासगावची लेणी आहेत.  1548 साली हा किल्ला पोर्तुगिजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. नंतरच्या काळात कान्हेजी आंग्रे यांनी हा गड काबिज करून त्यास "हिम्मतगड" असे नाव दिले. 

5/7

पूर्वी खाडीमार्गे व्यापर चालत असे या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी सावित्री नदीच्या मुखावर बाणकोटचा किल्ला बांधण्यात आला असे इतिहासतज्ञ सांगतात.

6/7

अनेक राजवटी पाहिलेला बाणकोटचा किल्ला "हिम्मतगड " आणि " फोर्ट व्हिक्टोरीया" या नावांनीही ओळखाला जातो. बाणकोट किल्ला लॅटरिटिक खडकांनी बांधलेला आहे. गडाला दोन दरवाजे आहेत. बाणकोट खाडीसमोरील उत्तरेकडील प्रवेशद्वार हे मुख्य द्वार आहे. तर, मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे तोंड करून यावर दगडी कोरीवकाम केलेले पहायला मिळते.    

7/7

पश्चिम महाराष्ट्रातील महाबळेश्वरच्या डोंगरातून  उगम पावणारी सावित्री नदी कोकणात जिथे अरबी समुद्राला मिळत्या संगमावर हा हिम्मतगड अर्थात बोणकोट किल्ला आहे.