पॅरिस फॅशन वीक सोमवारपासून सुरू झाला. या मेगा इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भारतीय कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये आलिया भट्ट आणि ऐश्वर्या राय दोघीही एकत्र स्पॉट झाल्या होत्या. दोघीही एकाच ब्रँडच्या रनवे शोचा भाग होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी ऐश्वर्या रायची स्टाइल लोकांना खूप आवडली. ऐश्वर्या राय पॅरिस फॅशन वीकमध्ये लॉरियल कंपनीची ॲम्बेसेडर म्हणून दिसली होती. रॅम्पवर, ऐश्वर्याने एथिकल रेडी-टू-वेअर फ्रेंच ब्रँड मोसीचा लाल बबल हेम गाऊन परिधान केला होता. या आउटफिटमध्ये ती एकदम रॉयल आणि ग्रेसफुल दिसत होती. इतकंच नाही तर ऐश्वर्या रायच्या स्टायलिश स्टाइलचंही खूप कौतुक झालं. रॅम्पवरील तिची चालही हृदय जिंकणारी होती. आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रॅम्पवर एक छोटीशी चूक दिसत आहे.


रॅम्पवर नेमकं काय घडलं?



फ्रेंच रेडी-टू-वेअर ब्रँड मॉसीच्या ऐश्वर्या रायच्या लाल बबल हेम गाऊनवर ब्रँडची टॅगलाइन लिहिलेली एक ट्रेल होती. जेव्हा ऐश्वर्या राय खूप लांब रॅम्पवर चालली तेव्हा बरेच लोक तिची ट्रेल उचलून तिथपर्यंत घेऊन आलेले दिसले. मात्र ऐश्वर्या जेव्हा पुढे रॅम्पवरून चालू लागली तेव्हा मात्र तिची ट्रेल मागेच राहिली. अचानक झालेल्या या गोंधळामुळे अभिनेत्री अजिबातच घाबरली नाही, संकोच केला नाही आणि तिच्या चेहऱ्यावर कोणतच टेन्शन पाहायला मिळालं नाही. ऐश्वर्या अगदी आरामात स्टेजवर चालत ती पुढे आली. एवढंच नव्हे तर ती पुढे आली आणि हॅलो म्हणाली आणि मग ती परत जायला लागली तेव्हा तिने स्वतः ट्रेल उचलला आणि तिच्या गाऊनवर फिक्स केला. तिने ट्रेल पुढे नेला आणि ब्रँडची टॅगलाइन उत्तम प्रकारे दाखवली. आता त्याच्या मनाची आणि आत्मविश्वासाची प्रशंसा केली जात आहे.


लोकांच्या प्रतिक्रिया 


हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने म्हटलं आहे की,'ऐश्वर्याच्या ग्रेससमोर कुणीच टिकू शकत नाही.' तर दुसरी व्यक्ती म्हणाली की,'ऐश्वर्याचा खराब परफॉर्मन्स देखील न्यू कमरसाठी बेस्ट आहे.' ऐश्वर्याच्या सौंदर्याची तर सगळ्यांनीच चर्चा केली. तिचा आत्मविश्वास आणि प्रसंगावधान याचं देखील कौतुक होताना दिसत आहे. काही युझर्सनी तर ऐश्वर्याच्या बोटातील अंगठी देखील ओळखली. ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र असल्याची पुन्हा एकदा चर्चा झाली.