Aishwarya Rai Look at 21: आपल्या सौंदर्यानं अनेकांच्याच मनावर राज्य करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिनं एक काळ गाजवला असं म्हणायला हरकत नाही. वयाची पन्नाशी ओलांडली असली तरीही वाढत्या वयाचा लवलेशसुद्धा ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर दिसत नाहीय. अशा या अभिनेत्रीच्या खासगी जीवनाविषयी मागील काही दिवसांपासून बरंच बोललं, लिहिलं गेलं. पण, या कशालाच न जुमानता ती मात्र तिचं आयुष्य मनसोक्त जगताना दिसली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हीच ऐश्वर्या, जी आता 51 वर्षांची आहे ती याच वयात इतकी सुंदर दिसतेय तर मग ऐन तारुण्यात ती कशी बरं दिसत असेल? चाहत्यांना हा प्रश्न अनेकदा पडत असतो. या प्रश्नाचं उत्तर देतोय साधारण 30 वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ. lehrentv च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 


मिस वर्ल्ड या सौंदर्यस्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर ऐश्वर्या जेव्हा भारतात परतली त्याचवेळी तिचं स्वागत होतानाचा हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये ती मायदेशी परतल्याचं दिसत असून, इथं निळ्या रंगाचा एक सुरेख असा ड्रेस तिनं घातल्याचं पाहायला मिळत आहे. मोकळे केस, कपाळावर टीकली, चेहऱ्यावरील सौंदर्य खुलवणारं हास्य आणि आनंद या साऱ्यामुळं ऐश्वर्याच्या सौंदर्यात आणखी भर पडताना दिसत आहे. 


हेसुद्धा वाचा : मुकेश अंबानींचं अँटिलिया आहे, त्या भूखंडाची मालकी आधी कोणाकडे होती? 


विमानतळावर भेटणाऱ्यांच्या स्वागताचा स्वीकार करत, अनेकांना अभिवादन करत आणि माध्यमांच्या प्रतिनिधींमधून वाट काढत इथं ऐश्वर्या पुढे जाताना दिसते. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या लूक आणि तिच्या सौंदर्यापेक्षा जास्त मनं जिंकली आहेत ती म्हणजे तिच्या हास्यानं. सोशल मीडियावर तिच्या या व्हिडीओला जवळपास 99 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून, हा व्हिडीओ सातत्यानं शेअर केला जात आहे. ज्यामुळं ऐश्वर्याची लोकप्रियता आजही अगदी सहजपणे लक्षात येत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Lehren (@lehrentv)


ऐश्वर्याच्या सौंदर्याची साऱ्या जगाला भुरळ 


19 नोव्हेंबर 1994 हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक नोंद करणारा दिवस ठरला. हा तोच दिवस होता जेव्हा ऐश्वर्यानं दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या मिस वर्ल्ड या स्पर्धेमध्ये भाग घेत ती स्पर्धा जिंकली होती. तब्बल 87 देशांच्या सौंदर्यवतींचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता. पण, ऐश्वर्याच्या सौंद्यापुढे मात्र त्याही फिक्या पडल्या, असं म्हणायला हरकत नाही.