मुंबई : सौंदर्याची व्याख्या म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्याला आज प्रत्येक जण ओळखतो. सौंदर्याने अनेकांवर भूरळ घालणाऱ्या ऐश्वर्याने पहिल्यापासून अपयशाचा सामना केला आहे. ऐश्वर्याचा रिपोर्ट कार्ड पाहिल्यानंतर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही. बॉलिवूडमध्ये ऐश्वर्याचे अनेक सिनेमे अपयशी ठरले.  विश्वसुंदरीचा एखादा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला असेल. पण अपयशाला न घाबरता ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये नाही, तर टॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चित्रपट निर्माता मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट 'पोनियान सेल्वम 1', जो एक पीरियड ड्रामा आहे, ज्यामध्ये दक्षिण सुपरस्टार विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला सिनेमा कल्की कृष्णमूर्तीच्या 1955 मध्ये आलेल्या 'पोनियान सेल्वम' नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.


ऐश्वर्याचा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.  साऊथ सिनेमा असला तरी, हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ऐश्वर्याचा आगामी सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करतो की नाही... हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे. 


ऐश्वर्याचे गेल्या 15 वर्षातील सिनेमे
ऐश्वर्याने गेल्या 15 वर्षांत नऊ सिनेमे केले आहेत आणि त्यापैकी फक्त एकच सिनेमा हिट ठरला. 2008 ते 2018 या दहा वर्षात ऐश्वर्याने जे सिनेमे केले त्यापैकी  2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ए दिल है मुश्किल' सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. 


तर ऐश्वर्याचे 'सरकार राज', 'रावण', 'अॅक्शन रिप्ले', 'गुजारिश', 'जज्बा', 'सरबजीत' आणि 'फन्ने खान' हे सात सिनेमे सुपर फ्लॉप ठरले. 2008 प्रदर्शित झालेल्या जोधा-अकबर सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. 


दरम्यान, बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे अपयशी ठरल्यानंतर ऐश्वर्याच्या अभिनयाची जादू साऊथ इंडस्ट्रीमध्ये यशस्वी ठरते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.