400 कोटींची संपत्ती, तरीही भाड्याच्या घरात राहतो 'हा' अभिनेता, 500 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये केलंय काम

बॉलिवूडमधील या अभिनेत्याने त्याच्या करिअरमध्ये 500 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हा अभिनेता 400 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. मात्र, असे असूनही तो भाड्याच्या घरात राहतो. तुम्ही ओळखलं का?   

| Nov 24, 2024, 18:08 PM IST
1/7

बॉलिवूड कलाकार

बॉलिवूडमधील अनेक कलाकार करिअर बनवण्यासाठी भाड्याच्या घरात राहतात. चित्रपटांमध्ये कमाई करून अलिशान घर खरेदी करतात. मात्र, हा अभिनेता 400 कोटींची संपत्ती असूनही भाड्याच्या घरात राहतो. 

2/7

करिअरची सुरुवात

बॉलिवूडमधील या अभिनेत्याने मुंबईमधील रेल्वे स्टेशनवर अनेक रात्री काढल्या आहेत. 1984 मध्ये अभिनेत्याने करिअरची सुरुवात केली होती. 

3/7

अनुपम खेर

या अभिनेत्याचे नाव अनुपम खेर आहे. अभिनेत्याने करिअरमध्ये 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांची एकूण संपत्ती 400 कोटी रुपये आहे. पण तरीही ते भाड्याच्या घरात राहतात. 

4/7

फिल्मफेयर अवार्ड

अनुपम खेर यांना इंडस्ट्रीमध्ये 42 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना 'सारांश' चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्यांना कॉमेडी अभिनयामुळे 5 वेळा फिल्मफेयर अवार्ड मिळाला आहे. 

5/7

खुलासा

नुकत्याच Curly Tales ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाड्याच्या घरात राहायला आवडते असं म्हटलं आहे. कारण त्यांना घराचा मालक व्हायच नाहीये. 

6/7

पैसे बँकेत ठेवा

अनुपम खेर पुढे म्हणाले की, महिन्याचे भाडे देऊन राहणे चांगले. ज्या पैशाने तुम्ही घर खरेदी करु शकता, ते तुमच्या बँकेत ठेवा आणि त्याद्वारे भाडे द्या. 

7/7

संपत्ती

रिपोर्टनुसार अनुपम खेर यांची संपत्ती 405 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये त्यांचे वार्षिक कमाई 30 कोटी रुपये आहे. म्हणजेच ते महिन्याला 3 कोटी रुपये कमवतात.