मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत की चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


आणखी वाचा : 'जर तू जीन्स घातलीस तर...', राज कपूर यांचं बोलणं ऐकून मंदाकिनी थांबलीच....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हुम्पलानं शेअर केला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या स्टुडिओमधून बाहेर पडत असून चेहरा लपवत थेट गाडीत जाऊन बसताना दिसते. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी संतापल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


आणखी वाचा : 'त्या' तीन सेकंदांनी बदललं ऐश्वर्या रायचं आयुष्य, एकदा तुम्हीही पाहा कुठे नशीब फळफळलं 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा : नागा चैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर वडील नागार्जुनचं धक्कादायक वक्तव्य
ऐश्वर्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, 'मेकअप नसेल म्हणून तोंड लपवते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मॅडमचा अॅटिट्यूड पाहिलात का?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ती आता म्हातारी झालीये, आता काय फोटो देणार.' 


आणखी वाचा : Akshara Singh चा MMS Video लीक? सोशल मीडियावर व्हिडीओ लिंक व्हायरल


ऐश्वर्या लवकरच मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्याला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली होती. या चित्रपटाच्या निमित्तानं नुकतीच ऐश्वर्या राय वांद्र्यातील एका स्टुडिओमध्ये पोहोचली होती. तिथलाच हा व्हिडीओ आहे. दरम्यान, या चित्रपटात त्रिशा, रवी आणि शोभिता धुलिपाला हे कलाकार देखील दिसणार आहेत.