मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक मानली जाते. तिच्या सौंदर्याची चर्चा केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही आहेत. ऐश्वर्याचे लाखो चाहते असून दररोज तिचे जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान, ऐश्वर्याची एक जुनी जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिनं अवघ्या 3 सेकंदात संपूर्ण लाइमलाइट हिरावून घेतली. ऐश्वर्याची ही जाहिरात बरीच जुनी आहे आणि ही जाहिरात प्रदर्शित होऊन जवळपास 19 वर्षे झाली आहेत. या जाहिरातीमुळेच ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड होण्यापूर्वीच प्रसिद्धीच्या झोतात आली होती. (Aishwarya Rai Old Advertisement went viral aamir khan Mahima Chaudhry abhishek bachchan)
जर आपण जाहिरातीबद्दल बोललो तर जाहिरातीत आपण पाहू शकतो की आमिर खान बुद्धिबळ खेळत आहे तेव्हा त्याची शेजारी महिमा चौधरी आली आणि तिनं कोल्ड ड्रिंक मागितलं पण आमिरच्या घरातील कोल्ड ड्रिंक संपलं. पावसात भिजत, वाहनांना धडकत देत आमिर कसातरी कोल्ड ड्रिंक आणतो, पण मग संजू म्हणजे संजनाची एंट्री होते आणि ऐश्वर्या अवघ्या तीन सेकंदांच्या भूमिकेत संजू बनून सगळी लाईमलाईट घेते.
1993 साली एका कोल्ड्रिंकची जाहिरात प्रदर्शित झाली होती. ज्यामध्ये आमिर खान, महिमा चौधरी आणि ऐश्वर्या राय महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. ब्युटी क्वीन होण्याआधीही ऐश्वर्यानं खूप नाव कमावलं होतं. ऐश्वर्याला तिच्या सौंदर्यामुळे अनेक प्रोजेक्ट्स मिळाले, पण कोल्ड्रिंकच्या जाहिरातीतून तिला मिळालेल यश तिच्या प्रसिद्धीशी तुलना करता येत नाही. 1994 मध्ये जेव्हा ऐश्वर्या मिस वर्ल्ड स्पर्धेत पोहोचली तेव्हा सर्वांना वाटलं की ऐश्वर्या या पुरस्काराची योग्य पात्र आहे. त्यानंतर ऐश्वर्यानं अभिषेक बच्चनशी लग्न केलं आणि ती बच्चन कुटुंबाची सून झाली.
ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री शेवटची 2018 मध्ये 'फन्ने खान' चित्रपटात दिसली होती. आता ऐश्वर्या लवकरच 'पोन्नियिन सेल्वन'मध्ये (Ponniyin Selvan) दिसणार आहे. हा चित्रपट याच महिन्यात म्हणजेच 30 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा चोल शासकांची कथा आहे.