Children Of Bollywood Actors : सध्या बॉलिवूडचे स्टार किड चांगलेच चर्चेत आहेत. निमित्त ठरलयं ते शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन. बॉलिवूड कलाकारांची मुलं धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकतात. शाळेच्या  वार्षिक स्नेहसंमेलनात स्टार किड्सनी आपली कला सादर केली. याच   वार्षिक स्नेहसंमेलनातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या ही बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा अब्राहम याला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांना ऐश्वर्या आणि शाहरुख यांच्या 'जोश' या चित्रपटाची आठवण झाली आहे. 


व्हिडिओ व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आराध्या आणि  अब्राहम यांचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्टेजवर अनेक मुलं उपस्थित आहेत. याच मुलांच्या गर्दीत आराध्या आणि  अब्राहम देखील आहे. मुलं एकमेकांशी मजा मस्ती करत आहेत. अब्राहम जवळच उभी असलेली आराध्या अब्राहमला प्रेमाने जवळ घेते. या व्हिडिओ सोबत जोश चित्रपटातील ऐश्वर्या आणि शाहरुख यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


सेम टू सेम 'जोश' चित्रपटासारखा सीन


अभिनेता शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांची प्रमुख भूमिका असलेला ‘जोश’ चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. यात   शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्या बहिण भावाचे नाते दाखवण्यात आले. चाहत्यांना  शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांची बहिण भावाची ऑनस्क्रीन जोडी खूपच आवडली होती. आराध्या आणि  अब्राहम यांच्या व्हायरल व्हिडिओसह 'जोश' चित्रपटाची एक छोटीव्हिडिओ क्लिक देखील व्हारल होत आहे. यात ‘जोश’ चित्रपटतील मॅक्स अर्थात शाहरुखची बहिण ऐश्वर्या म्हणजेच शर्ली त्याला प्रेमाने मिठी मारत आहे. असाच आराध्या आणि  अब्राहम यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 


वार्षिक स्नेहसंमेलनात स्टार किड्सची कलाकारी


करीना कपूर, शाहिद कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची मुले मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल शिक्षण घेतात. 15 डिसेंबर रोजी झालेल्या वार्षिक कार्यक्रमात सर्व सेलिब्रिटींच्या मुलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात पहिल्यांदा आराध्याचा वेगळा लूक पाहायला मिळालं.  पहिल्यांदा आराध्या वेगळ्या हेअरस्टाईलमध्ये दिसली. आराध्यानं नाटकात भाग घेतला होता. तिच्या या नाटकाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तिचा अभियन सर्वांच आवडला. अमिताभ बच्चन यांनी नात आराध्यासाठी एक खास पोस्ट शेअर तिचे कौतुक केले आहे. तर, शाहरुखचा मुलगा अब्राहम याने देखील खास परफॉर्मन्स दिला. यावेळी अब्राहम याने शाहरुखची सिग्नेचर पोज देऊन सगळ्यांची मनं जिकली.