मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन  आणि अभिनेता अभिषेक बच्चन बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांची मुलगी आराध्या बच्चन देखील तुफान चर्चेत असते. नुकताचं बच्चन कुटुंब आराध्याचा वाढदिवस साजरा करून मालदीवमधून परतले, तेव्हा तिघांना एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं.  तेव्हा तिघांचा एक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये आराध्या ठुमकत चालत असल्यामुळे तिला सोशल मीडियावर तुफान ट्रोल केलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये, ऐश्वर्या मुलगी आराध्याचा हात धरून पापाराझींमधून बाहेर पडताना दिसत आहे. अभिषेक बच्चन दोघींच्या मागे आहे. तिघेही एअरपोर्टमधून बाहेर पडताचं पापाराझींनी आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यादरम्यान सरळ चालणाऱ्या आराध्याची हालचाल बदलते आणि ती रॅम्प वॉक करताना दिसते.



यानंतर लगेच ऐश्वर्या हसायला लागते पापाराझींचे आभार. आराध्याच्या बदललेल्या हालचालीनंतर ऐश्वर्याचे हसते.  पण  आराध्याला मात्र ट्रोल करण्यात आलं. एका युझरने लिहिलं, 'हिला नक्की काय अडचण आहे, अशी ठुमकत का चालत आहे.' तर दुसऱ्या एका युझरने लिहिलं की, 'आराध्याला आईने चालायला शिकवलं असेल...' युझर्स अनेक कमेन्ट करत आराध्याला ट्रोल करत आहे. 


ऐश्वर्या का सतत धरते मुलीचा हात
एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले होते की, ती घरातून बाहेर येताच आराध्याचा हात धरते. ऐशने सांगितले होते की, आराध्या लहानपणापासूनच चर्चेत आहे. तिला कॅमेरे आवडतात आणि ती आनंदाने फोटो काढते. पण एकदा तिने असे केले ते पाहून तिला आश्चर्य वाटले. ऐश म्हणाली की एकदा आराध्याने तिच्या फोटोंसाठी जमिनीवर रेंगाळायला सुरुवात केली आणि हा खरोखरच खूप चिंताजनक विषय होता.....