मुंबई : ऐ दिल है मुश्किल या सिनेमानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन लवकरच फॅनी खान या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात ऐश्वर्यासह मुख्य भूमिकेत अनिल कपूर दिसणार आहेत. तब्बल १७ वर्षानंतर ऐश्वर्या आणि अनिल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

याआधी सुभाष घाई यांच्या ‘ताल’ आणि सतीश कौशिक यांच्या‘हमारा दिल आपके पास है’ या सिनेमांमध्ये ऐश्वर्या आणि अनिल कपूरने एकत्र काम केले होते.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. ऑगस्टमध्ये सिनेमाचे शूटिंग सुरु होईल.

याआधी सुभाष घाई यांच्या ‘ताल’ आणि सतीश कौशिक यांच्या‘हमारा दिल आपके पास है’ या सिनेमांमध्ये ऐश्वर्या आणि अनिल कपूरने एकत्र काम केले होते.