ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन बॉलिवुडमधील एक लोकप्रिय आणि कायम चर्चेत असलेलं कपल आहे. जेव्हा या दोघांचं लग्न झालं तेव्हा फक्त या लग्नाचीच सगळीकडे चर्चा होती. या दोघांचं 17 वर्षांपूर्वी लग्न झालं. पण गेल्या काही दिवसांपासून या दोघांचं नातं खूप चर्चेत आलं आहे. या दोघांच्या नात्यात अडचणी निर्माण झाल्याची चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोघांच्या नात्यात आता सगळं पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही. या दोघांनी घटस्फोट घेतला आहे किंवा घेणार असल्याची देखील चर्चा दबक्या पावलांनी होत आहे. तसेच अभिषेकचं अभिनेत्री निमरित कौरसोबत नाव जोडलं जात असून यांचीच चर्चा आहे. पण आतापर्यंत अभिषेक किंवा ऐश्वर्या या दोघांनीही या सगळ्यावर काहीच रिऍक्ट केलेलं नाही. 


या दोघांच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर हे दोघे सुरुवातीला एकमेकांचे चांगले फ्रेंड्स होते. पण या दोघांचं नातं कसं फुललं? मैत्रीचं रुपांतर प्रेमात कसं झालं? जाणून घ्या 



मैत्रीचं प्रेमात रुपांतर 


2018 मध्ये इंडिया टुडे एन्क्लेव्हमध्ये, अभिषेकने मैत्रीपासून प्रेमापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितले होते. अभिषेकने सांगितले की, त्यांची मैत्री ढाई आखर प्रेम (2000) या चित्रपटापासून सुरू झाली.


अभिषेक ऐश्वर्यासोबत चित्रपट करत राहिला


अभिषेक म्हणाला- 'आम्ही खूप चांगले मित्र होतो. आम्ही एकापाठोपाठ एक चित्रपट करत होतो. आमची नेहमीच घट्ट मैत्री होती आणि कालांतराने ती मैत्रीपेक्षा आणखी जास्त घट्ट झाली. अभिषेक आणि ऐश्वर्याने गुरू, रावण, धूम 2, कुछ ना कहो आणि सरकार सारखे चित्रपट एकत्र केले आहेत.


उमराव जान दरम्यान आले जवळ


अभिषेकने सांगितले- उमराव जान चित्रपटादरम्यान आमच्यातील नातं थोडं गंभीर झालं. मी ऐश्वर्याला प्रपोज केले आणि मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही 2007 मध्ये लग्न केले आणि आता आम्हाला एक सुंदर मुलगी आहे.


न्यूयॉर्कमध्ये केलं प्रपोझ 


अभिषेकने न्यूयॉर्कमध्ये ऐश्वर्याला प्रपोज केल असून 20 एप्रिल 2007 रोजी ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न झाले होते. तिच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांना एक मुलगी आराध्याही आहे.