मुंबई : टीव्ही कलाकार नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा लग्न बंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पण एका व्हिडिओने लोकांचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे अभिनेत्रीच्या डान्सने. आता ऐश्वर्याच्या गृहप्रवेशाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नील भट्टने ऐश्वर्याच्या गृहप्रवेशाचे काही फोटो शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्याच्या आईने आपल्या सुनेचे मोठ्या थाटात स्वगत केलं. सासरी प्रवेश केल्यानंतर तिने सर्व रीती पूर्ण केल्या. टीव्ही मालिका 'गुम है किसीके प्यार मे' ( Ghum Hai Kisikey Pyaar Meiin )  स्टार्स नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांनी 30 नोव्हेंबरला लग्न केलं. लग्न होताचं दोन्ही स्टार्स मुंबईला परतले.



सध्या बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरही लग्नाचा सीजन सुरू आहे.तर दोघंही आयुष्याच्या या नव्या सुरुवातीसाठी खूप आनंदी दिसत आहेत. आता त्यांच्या लग्नाचा लूक आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये खूप व्हायरल होत आहेत. 


नील रितीरिवाजांसह मिरवणुकीत नाचत आणि गाताना आपल्या वधूला घेण्यासाठी आला. आता त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.