Aishwarya Narkar : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री आहेत. आपल्या हटके अभिनयानं त्या सगळ्यांचेच मनोरंजन करताना दिसतात. टेलिव्हिजन क्षेत्रातही त्या फार सक्रिय आहेत. त्यांच्या अनेक भुमिका या गाजल्या आहेत. या सुखांनो या पासून ते स्वामिनीतील गोपिकाबाई ते आता सातव्या मुलीची सातवी मुलगी. त्यांच्या अभिनयाचे सर्वच जणं फॅन्स आहेत. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा रंगताना दिसते. ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावरही एक्टिव आहेत. त्यामुळेही त्यांची जोरात चर्चा असते. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे त्यांची यावेळी चांगलीच चर्चा रंगलेली आहे. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची जोडीही सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. ते अनेकदा एकमेकांचे रील्स शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या या व्हिडीओवरही फॅन्सही रिएक्ट होताना दिसतात. यावेळी ऐश्वर्या नारकर यांचा असाच एक रिल सोशल मीडियावर चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर नृत्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यातून नृत्य केल्यानं, शिकल्यानं आपल्याला त्याचे बरेच फायदे होतात. त्यातून आपल्याला शरीरालाही त्याचा चांगला फायदा होता. आपला फीटनेसही त्यानं सुधारतो. ऐश्वर्या नारकर यांची पोस्ट लक्षवेधी आहे, त्यांनी अविनाश नारकर यांच्यासोबत एक रिल शेअर केलं आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्या लिहितात की, ''डान्स करणं हा माझ्यासाठी फोबिया होता. पण या रील्सच्या ट्रेंडने मला फक्त शरीराच्या हालचाली करून आनंदी राहण्यापेक्षा डान्स करत समाधानी केलं आहे… हे त्या लोकांसाठी नाही जे म्हणतात 'या वयात काय हे?'… कोणी काय करावे आणि काय करू नये हे कोणीही कोणासाठी ठरवू शकत नाही… तुम्हाला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टींबरोबर तुम्ही पुढे जावं. हे तुमचं आयुष्य आहे आणि ते पूर्णपणे जगा.'' 


हेही वाचा : चक्क थिएटरमधून 'वर्क फ्रॉम होम?' X वर तुफान व्हायरल होतोय हा फोटो


डान्स करणं याला वयाची काहीच मर्यादा नाही. परंतु अनेकदा अभिनेत्रींनाही यावरून ट्रोल केले जाते. त्यातून अनेकदा त्यांच्या रडार लोकप्रिय अभिनेत्री असतात. अशाच आता चर्चा आहे ऐश्वर्या नारकर यांची. कारण यावेळी त्यांना ट्रोल केले जाते. ज्यावर त्यांनी भाष्य केले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या अविनाश नारकर हे 'सन मराठी'वरील 'कन्यादान' या मालिकेतून समोर आले आहेत. तर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या 'झी मराठी'वरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.