मुंबई : आभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर खानचा मुलगा तैमूर अली खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेहमी तैमूरचे अनेक फोटो व्हायरल होत आसतात. सध्या अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडीओ भलताचं व्हायरल होताना दिसत आहे. तिचा हा लहानपणीचा व्हिडीओ चाहत्यांमध्ये कमालीचा व्हायरल होत आहे.   90व्या दशकतात जर इंटरनेट अस्थित्वात असता तर आलिया भट्ट प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक असती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



'राझी' ,'गली बॉय' फेम अभिनेत्रीने 26व्या वर्षात पदार्पण केले आहे. 15 मार्चला तिने तिचा 26वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिच्या बहिणीने तिचा बालपणाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचबरोबर बहिण शाहीनने व्हिडीओ सोबत एक भावूक कॅप्शन दिले. आलियाने तिचा वाढदिवस तिच्या मित्र-मैत्रीणीं तसेच तिच्या कुटुंबासोबत साजरा केला. मसबा गुप्ता, अनुष्का रंजन, करण जोहर त्याचबरोबर आई सोनी रझदान वडील महेश भट्ट यांच्यासोबत राहत्या घरी साजरा केला. सध्या आलिया आणि रणबीरच्या नात्याची चर्चा सर्वत्र होत आहे. तर रणबीरने सुद्धा आलियाच्या वाढदिवसासाठी हजेरी लावली होती.


आलिया-रणवीर स्टारर 'गली बॉय' सिनेमाने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. बॉक्स ऑफिसवर सुद्धा सिनेमाने चांगला गल्ला जमवला. येत्या काही दिवसात आलियाचे दोन सिनेमे सिनेमागृहात दाखल होणार आहेत. 17 मार्च रोजी आलियाचा बहुप्रतिक्षीत सिनेमा 'कलंक' प्रदर्शित होत आहे. सिनेमाचे वारे फार वेगाने वाहत असल्याचे दिसून येत आहे आणि वर्षाखेरीस 'ब्रम्हास्त्र' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आलिया-रणबीर एकत्र झळकणार आहेत. आता आलियाचा कोणता चित्रपट चाहत्यांची मने जिंकण्यास यशस्वी ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.