मुंबई : अभिनयापासून वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या अनेक निर्णयांसाठी अभिनेता अजय देवगन ओळखला जातो. तो सहसा सोशल मीडियावर फार काही पोस्ट करत नाही. पण, जेव्हा केव्हा तो एखादी पोस्ट करतो तेव्हा मात्र सर्वाचं लक्ष वेधतो. आतासुद्धा त्यानं असंच काहीसं केलं आहे. (Ajay Devgan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त त्यानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. जिथं तो 20 वर्ष मागं गेल्याचं कळत आहे. 


काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलताना अजयनं यश आणि अपयशाच्या परिभाषाही स्वत:ला पटवून दिल्या आहेत. 


स्वत:लाच पत्र लिहित अजय म्हणतो, 'तू आता या टप्प्यावर आहेस जिथून तू एक अभिनेता म्हणून एका नव्या जगात पाऊल ठेवणार आहेस. 


मी प्रामाणिकपणे सांगतो, की तुला बरंच अपयश पचवायचं आहे. तू प्रयत्न कर खूप करशील. पण, अपयशी होशील. 


लोकांची टीका पाहता तू तुझ्याच स्वप्नांवर शंका व्यक्त करशील. यशापेक्षा अपयशाचा सर्वाधिक सामना करशील.'


अपयशाबाबत बोलतानाच मेहनत व्यर्थ जाणार नाही, असंही तो स्वत:लाच समजवताना दिसतो. 



ही मेहनत, अपयश हे सारंकाही फळणार आहे. कारण एक दिवस स्वत:चं स्वत्वं जपणं हेच तुझी ताकद ठरणार आहे, असं अजय लिहितो. 


थांबू नकोस, स्वत:च्या मर्यादा ओलांड.... पुढे जा इतरांच्या अपेक्षांचं ओझं तुझ्या स्वप्नांच्या आणि ताकदीच्या आड येऊन देऊ नकोस असं म्हणत तो स्वत:ला आणि ओघाओघानं सर्व तरुण वर्गाला उर्जात्मक संदेश देताना दिसतो.