अजय देवगनने उडवली काजोलची खिल्ली ; काजोलने दिली ही धमकी...
बॉलिवूड अभिनेत्री काजोल चुलबूली आणि मनमौजी आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल चुलबूली आणि मनमौजी आहे. काजोल-अजय देवगन यांचाही मजेशीर अंदाज चाहत्यांना भावतो. या जोडीचा मजेदार अंदाजाची झलक सोशल मीडियावरही दिसून येते. गुरुवारी काजोल आपल्या मुलीसह सिंगापूर येथील तिच्या वॅक्स स्टॅच्यूच्या उद्घाटनासाठी गेली होती. त्या दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर करत अजय देवगनने सोशल मीडियावर काजोलची खिल्ली उडवली.
अजय-काजोलचा मजेशीर अंदाज
अजय देवगनने आपली मुलगी न्यासा आणि पत्नी काजोलचा वॅक्स स्टॅच्यूसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करताना अजयने लिहिले की, भेटा शांत काजोलला... अजयच्या या खिल्लीवर काजोलनेही मजेशीर उत्तर दिले. मुझे घर आने दो... अशी कमेंट करत काजोलने पत्नीगिरी दाखवली. तुम्हीही पहा या दोघांच्या मजेशीर गप्पा...
ही आहे त्यांच्या लवस्टोरीची खासियत
अजय देवगन आणि काजोलचा विवाह २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये झाला. यांच्या लवस्टोरीची खासियत म्हणजे दोघांनीही एकमेकांना प्रपोज नाही केले. पण त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे, हे त्यांना माहित होते.