हिंदी भाषेबाबत किच्चा सुदीपवर भडकला अजय देवगन म्हणाला, ``हिंदी ही राष्ट्रभाषा होती...``
काही दिवसांपासून ट्विटरवर हिंदी भाषेबाबत विविध प्रकारचे ट्विट केले जात होते.
मुंबई : काही दिवसांपासून ट्विटरवर हिंदी भाषेबाबत विविध प्रकारचे ट्विट केले जात होते. आधी, KGF 2 च्या यशानंतर, किच्चा सुदीपकडून 'हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही' असं विधान करण्यात आलं होतं. बॉलीवूड पॅन इंडिया चित्रपट बनवण्यासाठी धडपडत आहे. तर साऊथचे चित्रपट यापूर्वीच यशस्वी झाले आहेत.
किच्चा सुदीपच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या सतत प्रतिक्रिया येत आहेत. चाहत्यांसोबतच आता सेलिब्रिटीही या वक्तव्यावर आपली मतं मांडताना दिसत आहेत. तर अलीकडेच बॉलीवूड स्टार अजय देवगणचं एक ट्विट समोर आलं आहे. या ट्विटमध्ये अजय देवगणने किच्चा सुदीपला सडेतोड उत्तर दिलं आहे.
अजय देवगनने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'माझ्या भावा, तुमच्या मते जर हिंदी आमची राष्ट्रभाषा नसेल तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करता? हिंदी ही आपली मातृभाषा आहे, होती आणि राहील. जन गण मन.' अजय देवगणच्या या ट्विटवर लोकं तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.