मुंबई : अजय देवगन (Ajay Devgn) ची मुलगी, न्यासा मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. न्यासा सध्या तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करत असली तरीही सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो तिला चर्चेत आणण्यास पुरेसे ठरत आहेत. सध्या तिचे स्पेनमधील सुट्ट्यांचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये न्यासा अतिशय सुंदरही दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरं, तिच्या सौंदर्यापलीकडेही जाऊन चर्चा होतेय ती मात्र एका तरुणाची ज्याला न्यासा मिठी मारलेली दिसत आहे. हा आहे तरी कोण, असाच प्रश्न काजोलही तिला विचारु शकते. कारण आहे, तो म्हणजे हा फोटो. (Ajay devgan kajol daughter nyasa grabs attention as she accompained with a strange guy)


...तर, न्यासानं मिठी मारलेल्या या तरुणाचं नाव आहे ओरहान अवात्रामणि (Orhan Awatramani). एक अॅक्टिविस्ट म्हणून त्याची ओळख आहे. अनेक कलाकारांच्या मुलांशी त्याची मैत्री आहे. सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांचाही तो चांगला मित्र आहे. 


न्यासा अभ्यासातून वेळ काढून सध्या तिच्या खास मित्रांसमवेत वेळ घालवताना दिसत आहे. यावेळी तिची स्टाईल स्टेटमेंटही पाहण्याजोगी आहे. आपण ज्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलो आहोत त्या ठिकाणचं वातावरण आणि एकंदर स्थापत्य पाहता तिनं निवडलेले कपड्यांचे रंगही निरखून पाहावेत असेच आहेत. 



बरं, मुद्द्याची गोष्टी ही की ओरहान अवात्रामणि (Orhan Awatramani) हा न्यासाचा चांगला मित्र आहे. त्यामुळं त्या दोघांबद्दलही तिसराच विचार डोक्यात न येऊ दिलेलाच बरा. ओरहान सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे, त्याच्या फॉलोअर्सची संख्याही जास्त आहे.